ज्येष्ठ संस्कृततज्ज्ञ पंडित वसंतराव गाडगीळ यांचे निधन
पुणे, 18 ऑक्टोबर (हिं.स.)। पुण्यातल्या शारदा ज्ञान पीठमचे संस्थापक आणि ज्येष्ठ संस्कृत अभ्यासक पंडित वसंतराव गाडगीळ यांचे वृद्धापकाळानं निधन झाले. ते 95 वर्षांचे होते. आज, शुक्रवारी सकाळी वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार क
Gadgil news


पुणे, 18 ऑक्टोबर (हिं.स.)।

पुण्यातल्या शारदा ज्ञान पीठमचे संस्थापक आणि ज्येष्ठ संस्कृत अभ्यासक पंडित वसंतराव गाडगीळ यांचे वृद्धापकाळानं निधन झाले. ते 95 वर्षांचे होते. आज,

शुक्रवारी सकाळी वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. संस्कृततज्ज्ञ मंडळी आणि गाडगीळ परिवाराचे नातेवाईक, मित्र आणि शिष्यवर्ग या प्रसंगी उपस्थित होते.

पंडित गाडगीळ यांनी धर्म, संस्कृती, आणि इतिहास या क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांच्या निधनाने शास्त्र, संस्कृती आणि अध्यात्मिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. पंडित गाडगीळ यांचे योगदान आणि त्यांची बौद्धिक वारसा पुढील पिढ्यांना प्रेरणा देईल, असा विश्वास संस्कृत विद्वानांनी व्यक्त केला आहे.

संस्कृत भाषेच्या प्रचार प्रसारासाठी पंडित वसंतराव गाडगीळ यांच व्यक्तिमत्व समर्पित होत. प्राचीन संस्कृत ग्रंथ, वेद उपनिषदे यांचा त्यांचा गाढा अभ्यास होता . टिळक महाराष्ट्र विद्यापीठात संस्कृत अध्यापन , शारदा ज्ञानपीठाची स्थापना, शारदा संस्कृत मासिक , दर वर्षी पुण्यात ऋषीपंचमी निमित्त 80 वर्षांवरील तपस्वी, विद्वान, व्यक्तींचा सत्कार आदि विविध कार्य त्यांनी केल . ते संस्कृत भाषेत संभाषण करत असत आणि संस्कृत भाषेच्या प्रचारासाठी त्यांनी देशा परदेशात शेकडो व्याख्याने दिली.

आपल्या प्रदीर्घ जीवनात संस्कृती आणि धर्माच्या क्षेत्रातील अनेक ग्रंथांची निर्मिती केली, ज्यामुळे भारतीय विद्या संचिताला एक नवे दालन उघडले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande