नगर - कलर्स ऑफ प्राईड चित्रकला स्पर्धेतील प्रथम विजेत्यांना मिळाल्या सायकली
अहमदनगर, 18 ऑक्टोबर (हिं.स.):- लायन्स क्लब ऑफ अहमदनगर प्राईड,लायन्स क्लब ऑफ अहमदनगर व लिओ क्लबच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या कलर्स ऑफ प्राईड या चित्रकला स्पर्धेतील प्रथम विजेत्यांना सायकलचे तर इतर विजेत्यांना आकर्षक बक्षीस प्रदान करण्यात आले.
कलर्स ऑफ प्राईड चित्रकला स्पर्धेतील प्रथम विजेत्यांना सायकल दिल्या बक्षिस


अहमदनगर, 18 ऑक्टोबर (हिं.स.):- लायन्स क्लब ऑफ अहमदनगर प्राईड,लायन्स क्लब ऑफ अहमदनगर व लिओ क्लबच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या कलर्स ऑफ प्राईड या चित्रकला स्पर्धेतील प्रथम विजेत्यांना सायकलचे तर इतर विजेत्यांना आकर्षक बक्षीस प्रदान करण्यात आले.

अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या प्रमुख कार्यवाह छायाताई फिरोदिया यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शहरात झालेल्या बक्षीस वितरण कार्यक्रमाप्रसंगी अरविंद पारगावकर,लायन्स प्राईडचे अध्यक्ष अनिकेत आवारे,सचिव अक्षत झालानी,खजिनदार अक्षय तोडमल, लायन्स क्लब ऑफ अहमदनगरच्या अध्यक्षा डॉ.अनघा पारगावकर,सचिव डॉ.सिमरन वधवा,लिओ क्लबच्या अध्यक्षा रिधिमा गुंदेचा,हरजितसिंह वधवा,सनी वाधवा,अभिजित भलगट, हर्षवर्धन बोरुडे,रोहन खंडेलवाल,प्रभा भलगट,समिक्षा खंडेलवाल,अंकिता झालानी,डॉ.अस्मिता आवारे आदींसह लायन्सचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

छायाताई फिरोदिया म्हणाल्या की,मुलांमध्ये जन्मजात काही कला गुण असतात.ते ओळखून त्या दिशेने त्यांना प्रोत्साहन दिल्यास त्यांची झपाट्याने प्रगती होते. जगात कला क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांना मोठी संधी असून,कला क्षेत्रात लायन्स प्राईडने विद्यार्थ्यांना एक चांगले व्यासपिठ निर्माण करुन दरवर्षी घेतल्या जाणाऱ्या चित्रकला स्पर्धेचे त्यांनी कौतुक केले.नुकतेच झालेल्या या चित्रकला स्पर्धेत शहर व उपनगरातील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता.विद्यार्थ्यांच्या कला-गुणांना वाव देण्यासाठी दरवर्षी कलर्स ऑफ प्राईड या चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात येते.या स्पर्धेचे हे सहावे वर्ष होते. ही स्पर्धा तीन गटात घेण्यात आली. पहिला गट एलकेजी ते पहिली दुसर गट दुसरी ते पाचवी तिसरा गट सहावी ते दहावी, त्यांना अनुक्रमे रेखाटलेल्या चित्रात रंग भरणे, नैसर्गिक देखावा किंवा सण-उत्सव, जागतिक शांतता किंवा सक्षम भारत हे विषय स्पर्धेच्या ठिकाणी देण्यात आले होते. विशेष गटात झालेल्या स्पर्धेत स्नेहालय, बालभवन, मुकबधीर व दिव्यांग विद्या र्थ्यांचा समावेश होता.या स्पर्धेत एलकेजी ते इयत्ता पहिली (लहान गट) प्रथम- काम्या वर्मा (आर्मी पब्लिक स्कूल), द्वितीय- संस्कृती झोडगे (अशोकभाऊ फिरोदिया), तृतीय- स्वर्ण प्रवीण साळुंके (बाई इचरज बाई), उत्तेजनार्थ दक्ष अभय दायमा (एसआरईएफ), दिव्यांग (माउंट लिटेरा झी स्कूल). इयत्ता दुसरी ते पाचवी (मोठा गट) प्रथम- ओजस वैकर (ऑक्झिलियम कॉन्व्हेंट), द्वितीय- चिन्मय (आयकॉन पब्लिक स्कूल), तृतीय- स्वर्ण रमेश बोल्ली (भाऊसाहेब फिरोदिया स्कूल), उत्तेजनार्थ- पूजा योगेश ताटी (विवेकानंद स्कूल), मालकर (सेक्रेडहार्ट कॉन्व्हेंट). इयत्ता सहावी ते दहावी (वरिष्ठ गट)- प्रथम- आर्या सुनील निंबाळकर (एसएनबीपी), द्वितीय- सोम्या सचिन जाधव (कर्नल परब),तृतीय- अपूर्वा नांदूकर (सेंट विवेकानंद), उत्तेनार्थ- आरुष हेमंत विटणकर (आयकॉन पब्लिक स्कूल), कीर्ती मनोज पवार (अशोकभाऊ फिरोदिया). विशेष श्रेणीत घेण्यात आलेली स्पर्धा लहान गट प्रथम- सार्थक नवनाथ हरारे (मूकबधिर विद्यालय), द्वितीय- प्रणवी पिसाळ (स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल), मोठा गट प्रथम- सोहम औराडे (स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल), द्वितीय- ईश्‍वरी दीपक बिडकर (किशोर बालभवन), वरिष्ठ गट प्रथम- अशोक दरंदले (मूकबधिर विद्यालय), द्वितीय- श्रृती विलास चकाले (बालभवन डॉ. अ. कलाम) यांनी बक्षिसे मिळवली. उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते सर्व विजेत्यांना बक्षीसे देण्यात आली.

हिंदुस्थान समाचार / Shirish Kulkarni


 rajesh pande