जळगाव, 2 ऑक्टोबर (हिं.स.)एका २४ वर्षीय तरूणीला लग्नाचे खोटे आमिष दाखवत गेल्या सहा महिन्यांपासून भुसावळ शहरातील वेगवेगळ्या लॉजवर नेवून अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी मंगळवारी १ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री १ वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भुसावळ शहरातील एका भागात राहणारी २४ वर्षीय तरूणी ही आपल्या कुटुंबासह राहते. तिची शुभम शैलेश कोळी याच्याशी ओळख निर्माण झाली. त्यानंतर शुभमने तरूणीला लग्नाचे खोटे आमिष दाखवत तिच्यावर गेल्या सहा महिन्यांपासून भुसावळ शहरातील वेगवेगळ्या लॉजवर नेवून अत्याचार केला. त्यानंतर तिच्या सोबत लग्न करण्यास नकार दिला. दरम्यान या प्रकारानंतर तरूणीने थेट भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली. त्यानुसार मंगळवारी १ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री १ वाजता संशयित आरोपी शुभम शैलश कोळी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश धुमाळ हे करीत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर