चंद्रपूरमध्ये वाघनखांसह 2 आरोपींना अटक
चंद्रपूर, 22 ऑक्टोबर (हिं.स.)।शहरात वाघनखे विक्री करण्यासाठी येणाऱ्या दोन आरोपींना वाघाच्या दोन नखांसह स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक अवैध धंद्यांची
दोन आरोपींना वाघाच्या दोन नखांसह स्थानिक गुन्हे शाखेने केली अटक


चंद्रपूर, 22 ऑक्टोबर (हिं.स.)।शहरात वाघनखे विक्री करण्यासाठी येणाऱ्या दोन आरोपींना वाघाच्या दोन नखांसह स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक अवैध धंद्यांची माहिती काढून त्यावर कार्यवाही करण्याची मोहीम राबवित होते. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला काही इसम वाघाच्या नखाची विक्री करण्याकरिता चंद्रपुर शहरातील गिरीराज हॉटेल समोर येणार अशी माहिती मिळाली. माहितीच्या आधारावर स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचत वाघनखे विकण्याकरिता २ जण आले असता दोघांना मोठ्या शिताफीने अटक केली. पोलिसांनी दोघांकडून २ वाघनखे जप्त केली. चंद्रपुरातील ५१ वर्षीय मजुरी करणारे नंदकिशोर साहेबराव पिंपळे व ६५ वर्षीय रवींद्र शिवचंद्र बोरकर अशी दोन आरोपींची नाव आहे. पुढील कारवाईकरिता वनविभागाचे सहायक वनसंरक्षकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. सदर वाघनखे कुठून आली? ती कुणाला विकणार होते? याबाबत वनविभाग पुढील तपास करीत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव


 rajesh pande