डोंबिवलीत तीन घरफोड्यात 6 लाख 52 हजारांचा ऐवज लंपास
डोंबिवली, 22 ऑक्टोबर (हिं.स.) कल्याण परिमंडळ 3 परिक्षेत्रात अज्ञान चोरट्यांचा हैदोस घातला आहे. एकाच दिवसात अज्ञात चोरट्यांनी तीन घटनेतील बंद दुकान व घरातून 6 लाख 52 हजार रुपयांचा ऐवज लंपास करून पोबारा केला आहे. पोलीसांकडून या घटनेचा तपास सुरू असल्य
डोंबिवलीत तीन घरफोड्यात 6 लाख 52 हजारांचा ऐवज लंपास


डोंबिवली, 22 ऑक्टोबर (हिं.स.) कल्याण परिमंडळ 3 परिक्षेत्रात अज्ञान चोरट्यांचा हैदोस घातला आहे. एकाच दिवसात अज्ञात चोरट्यांनी तीन घटनेतील बंद दुकान व घरातून 6 लाख 52 हजार रुपयांचा ऐवज लंपास करून पोबारा केला आहे. पोलीसांकडून या घटनेचा तपास सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मानपाडा पोलीस स्टेशन हद्दीतील सोनारपाडा विघ्नेश अपार्टमेंट येथील अमनकुमार अरुण सिंग यांच्या तक्रारीनुसार सिंग राहत असलेल्या घरात कोणी नसताना घराच्या खिडकिवाटे प्रवेश करून घरातील बेडरूममध्ये असलेल्या कपाटाचे दरवाजे कशाचेतरी साहाय्याने उचकटुन त्यातील 2 लाख 39 हजार चारशे रुपयांचा मुद्येमाल अज्ञात चोरटयाने चोरी करून नेला. मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून साहाय्यक पोलीस निरीक्षक शहादे अधिक तपास करीत आहेत. दुसऱ्या घटनेत कोळसेवाडी पोलीस ठाणे हद्दीत नांदिवली कोळीवाडा कल्याण पूर्व येथील शिक्षिका सारिका संजय मोहिते यांच्या राहत्या घराच्या बेडरूमच्या उघडया दरवाजावाटे कोणीतरी अज्ञात चोरटयाने आत बेडरूमध्ये प्रवेश करून, बेडरूम मधील लोखंडी कपाटाचा दरवाजा कशाने तरी उघडुन, कपाटाची तिजोरी कशाच्या तरी सहाय्याने वाकवुन, तिजोरी उघडुन, तिजोरीत ठेवलेले एक लाख सत्तर हजार रुपयांच्या किंमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कमेवर चोरट्यांनी डल्ला मारला. याबाबतची तक्रार कोळसेवाडी पोलीस ठाण्यात केली असून पोलीस हवालदार भामरे अधिक तपास करीत आहेत. तर, तिसऱ्या घटनेत हरिष शंकर तिमणपट्टे यांच्या खोणी येथील पटेल आर मार्टचे शटर उचकटुन दोन लाख तीन हजार पाचशे रुपयांचा मुद्येमाल कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरून नेला या विषयी मानपाडा पोलीस ठाण्यात चोरीच्या घटनेची तक्रार दाखल केली असून साहाय्यक पोलीस निरीक्षक शहादे अधिक तपास करीत आहेत. अशाप्रकारच्या चोरी व घरफोडी घटनांचा परिसरातील नागरिकांनी धसका घेतला असून शहरात कायदा सुव्यवस्था अबाधित आहे का अशी विचारणा नागरिक करीत आहेत.

---------------------------

हिंदुस्थान समाचार / Prashant Joshi


 rajesh pande