मद्यपी वाहनचालकांवर कडक कारवाई करण्याचे पोलीस आयुक्तांचे आदेश
पुणे, 22 ऑक्टोबर (हिं.स.)।शहरात आता दररोज रात्री नाकाबंदी करून मद्यपी वाहनचालकांविरुद्ध कारवाई केली जाणार आहे. त्यासाठी वाहतूक पोलिसांनी २७ ठिकाणे निश्चित केली आहेत. या कारवाईसाठी सहायक पोलीस आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येणार असल्या
Pune CP news for today newss


पुणे, 22 ऑक्टोबर (हिं.स.)।शहरात आता दररोज रात्री नाकाबंदी करून मद्यपी वाहनचालकांविरुद्ध कारवाई केली जाणार आहे. त्यासाठी वाहतूक पोलिसांनी २७ ठिकाणे निश्चित केली आहेत. या कारवाईसाठी सहायक पोलीस आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.

बेशिस्त वाहनचालकांविरुद्ध कारवाई करण्यासाठी दररोज रात्री ११ ते पहाटे तीनपर्यंत शहरातील वेगवेगळ्या भागांत नाकाबंदी करून वाहनचालकांची तपासणी करण्यात येणार आहे. नाकाबंदीसाठी शहर, उपनगरातील २७ ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. या मोहिमेत सहायक पोलीस आयुक्तांसह १२५ पोलीस कर्मचारी सहभागी होणार आहेत. बेशिस्त वाहनाचालकांना शिस्त लावण्यासाठी दररोज रात्री नाकाबंदी करण्यात येणार आहे.विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध कारवाई करण्यास सुुरुवात झाली आहे. वाहतूक नियमभंग करणाऱ्या वाहनचालकाचे वाहन जप्त केले जाणार आहे,’ असे अमितेश कुमार यांनी सांगितले. अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविली जाणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande