कोलकाता, 26 ऑक्टोबर
(हिं.स.) : पश्चिम बंगालमध्ये दिवाळीच्या काळात
अशांतता निर्माण करण्याचा कट रचला जात असल्याचा दावा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी
यांनी केलाय. त्यानुषंगाने
राज्यात पोलीस
बंदोबस्त वाढवण्याचे आवाहन ममता बॅनर्जींनी केले आहे.
यासंदर्भात ममता
बॅनर्जी म्हणाल्या की, लवकरच काली पूजा येत आहे. पोलीस आणि विशेष टास्क
फोर्सने गुप्तचर माहिती गोळा करावी आणि राज्यात कोणताही स्फोट होणार नाही, याची खात्री करावी.
बंगालमध्ये जातीय दंगली भडकवण्याचा आणि हिंसाचार घडवण्याचा कट रचला जात आहे, जो थांबवला पाहिजे. यावर्षी
काली पूजा दिवाळीच्याच दिवशी म्हणजे 31 ऑक्टोबर रोजी आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी
सावध केले की, काही गट सणासुदीच्या काळात विशेषतः कोलकातामध्ये
धार्मिक शांतता भंग करण्याचा प्रयत्न करू शकतात. मला बंगालमध्ये जातीय तणाव नको
आहे. कोणत्याही भडकावणाऱ्यावर पोलीस कठोर कारवाई करतील, पण मी मीडियाला
विनंती करते की, हे सनसनाटी निर्माण करू नका. कृपया जनतेला
भडकावणे टाळा असे मुख्यमंत्र्यांनी म्हंटले आहे.
-------------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी