रत्नागिरी : मनीषा बेडगे यांना क्रीडारत्न पुरस्कार प्रदान
रत्नागिरी, 26 ऑक्टोबर, (हिं. स.) : राष्ट्रीय जलतरणपटू आणि मराठा मंदिर ग्लोबल स्कूलमधील जलतरण क्रीडा शिक्षिका मनीषा संजय बेडगे यांना क्रीडा रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कोल्हापूरमधील आविष्कार फाऊंडेशनमार्फत दिला जाणारा हा राज्यस्तरीय क्रीडा
मनीषा बेडगे


रत्नागिरी, 26 ऑक्टोबर, (हिं. स.) : राष्ट्रीय जलतरणपटू आणि मराठा मंदिर ग्लोबल स्कूलमधील जलतरण क्रीडा शिक्षिका मनीषा संजय बेडगे यांना क्रीडा रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कोल्हापूरमधील आविष्कार फाऊंडेशनमार्फत दिला जाणारा हा राज्यस्तरीय क्रीडा रत्न पुरस्कार कोल्हापूर येथे प्रदान करण्यात आला. मनीषा बेडगे यांना यापूर्वी 'क्रीडा संघटक' म्हणून शासकीय क्रीडा पुरस्कार मिळाला आहे. कोल्हापूरचा क्रीडारत्न पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत किसनराव कुन्हाडे, ज्येष्ठ पत्रकार ताज मुलाणी, सुरेश उगरे, शिवाजी कोरवी, दत्तात्रय सूर्यवंशी, रंगराव सूर्यवंशी, माधुरी सावंत, भोसले आणि संजय पवार या मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी त्यांचे पती संजय बेडगे, मुलगे, सासू सासरे व संपूर्ण बेडगे परिवार उपस्थित होता.

---------------------------------

हिंदुस्थान समाचार / बाळकृष्ण कोनकर


 rajesh pande