रत्नागिरी : दापोली तालुक्यात वानर पकडण्याची मोहीम यशस्वी
रत्नागिरी, 26 ऑक्टोबर, (हिं. स.) : दापोली तालुक्यातील आंबवली बुद्रुक येथे दापोली वन विभागाने वानर पकडण्याची विशेष मोहीम राबवून अनेक वानरांना पिंजऱ्यात बंद केले. दापोली तालुक्यातील ग्रामीण भागात वानरांचा त्रास दिवसेंदिवस वाढत आहे. आंबवली बुद्रुक ग्रा
पकडलेली वानरे


रत्नागिरी, 26 ऑक्टोबर, (हिं. स.) : दापोली तालुक्यातील आंबवली बुद्रुक येथे दापोली वन विभागाने वानर पकडण्याची विशेष मोहीम राबवून अनेक वानरांना पिंजऱ्यात बंद केले.

दापोली तालुक्यातील ग्रामीण भागात वानरांचा त्रास दिवसेंदिवस वाढत आहे. आंबवली बुद्रुक ग्रामपंचायतीच्या मागणीनुसार वन विभागाकडून २ दिवस पिंजरे लावून वानर पकडण्यात आले. यावेळी आंबवली बुद्रुक येथील ग्रामस्थ तसेच परिक्षेत्र वनविभागीय अधिकारी पी. जी. पाटील, दापोली वनपाल आर. डी. खोत, वनरक्षक शुभांगी गुरव, सूरज जगताप, दिगंबर झाडे, शुभांगी भिलारे, मनीष लोखंडे, जिनेश चिलबे, नीलेश केळशीकर, चंद्रकांत बंगाल आदींचे विशेष सहकार्य मिळाले.पिंजऱ्यात सापडलेल्या वानरांना सुरक्षितरीत्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / बाळकृष्ण कोनकर


 rajesh pande