नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ
अकोला, 31 जुलै (हिं.स.)।पीएमश्री जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करण्यास १३ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अद्यापर्यंत अर्ज केले नाहीत अशा विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज https://cgseitms.rcil.gov.in/nvs/index/
नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ


अकोला, 31 जुलै (हिं.स.)।पीएमश्री जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करण्यास १३ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

ज्या विद्यार्थ्यांनी अद्यापर्यंत अर्ज केले नाहीत अशा विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज https://cgseitms.rcil.gov.in/nvs/index/Registration या संकेतस्थळावर करावे, असे आवाहन असे आवाहन विद्यालयाच्या प्राचार्य कविता चव्हाण यांनी केले आहे. प्रवेश परीक्षेच्या माध्यमातून जिल्ह्यातून ८० विद्यार्थ्यांची निवड केली जात असून ही प्रवेश परीक्षा १३ डिसेंबर २०२५ रोजी होणार आहे.

पात्रता

विद्यार्थी सलग ३री ते ५वी इयत्ता शाळेत शिकलेला असावा, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी किमान ४० टक्के अपंगत्व असल्यास अधिकृत वैद्यकीय प्रमाणपत्र आवश्यक राहील. अधिक माहितीसाठी जवाहर नवोदय विद्यालय, बाभुळगांव जहा., येथे अथवा 0724-2991087 दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande