राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची दुसरी 22 उमेदवारांची यादी जाहीर
* एकूण 67 उमेदवार घोषित मुंबई, २६ ऑक्टोबर (हिं.स.) : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेत विधानसभेसाठी 22 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीत 45 उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. आता
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची दुसरी 22 उमेदवारांची यादी जाहीर


* एकूण 67 उमेदवार घोषित

मुंबई, २६ ऑक्टोबर (हिं.स.) : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेत विधानसभेसाठी 22 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीत 45 उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. आतापर्यंत 67 जणांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.

दुसऱ्या यादीमध्ये एरंडोल - सतीश आण्णा पाटील, गंगापूर - सतीश चव्हाण, शहापूर - पांडुरंग बरोरा, परांडा - राहुल मोटे, बीड - संदीप क्षीरसागर, आर्वी - मयुरा काळे, बागलाण - दीपिका चव्हाण, येवला - माणिकराव शिंदे, सिन्नर - उदय सांगळे, दिंडोरी - सुनिता चारोसकर, नाशिक पूर्व - गणेश गीते, उल्हासनगर - ओमी कलानी, जुन्नर - सत्यशील शेरकर, पिंपरी - सुलक्षणा शिलवंत, खडकवासला - सचिन दोडके, पर्वती - अश्विनी कदम, अकोले - अमित भांगरे, अहिल्यानगर शहर - अभिषेक कळमकर, माळशिरस - उत्तम जानकर, फलटण - दीपक चव्हाण, चंदगड - नंदिनी बाभूळकर-कुपेकर, इचलकरंजी - मदन कारंडे यांचा समावेश आहे.

दरम्यान जयंत पाटील यांनी राज्य सरकारवर टीका करताना म्हटले की, लाडक्या बहि‍णींना निवडणुकीपुरतच गोंजरण्याचं काम सुरू आहे. जयश्री थोरात यांच्याबद्दल जे विधान करण्यात आलं ते अत्यंत दुर्दैवी होतं. लाडक्या बहिणींना कसं वागवलं जात हे राज्यानं पाहिलं. कापूस आणि सोयाबिणचं मोठं नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावला आहे. मात्र महायुतीच्या सरकारनं शेतकऱ्यांना कोणतीही मदत केली नाही, आज दिवसाला दोन शेतकरी आत्महत्या करत आहेत, असं जयंत पाटील यांनी म्हटलं.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande