- आतापर्यंत १२१ उमेदवार घोषित
मुंबई, 26 ऑक्टोबर (हिं.स.) - आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपने आज २२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. आतापर्यंत दोन यादी जाहीर केल्या असून त्यात एकूण १२१ उमेदवारांचा समावेश आहे. दुसऱ्या यादीत मुंबईच्या एकाही मतदारसंघाचं नाव नाही. भाजपने पुण्यातील तिन्ही जुन्याच चेहऱ्यांना पुन्हा संधी दिली आहे.
या यादीत धुळे ग्रामीण - राम भदाणे, मलकापूर - चैनसुख संचेती, अकोट - प्रकाश भारसाकले, अकोला पश्चिम - विजय अग्रवाल, वाशिम - श्याम खोडे, मेळघाट - केवळराम काळे, गडचिरोली - मिलिंद नरोटे, राजुरा - देवराव भोंगले, ब्रह्मपूरी - कृष्णलाल सहारे, वरोरा - करण देवतळे, नाशिक मध्य - देवयानी फरांदे, विक्रमगड - हरिश्चंद्र भोये, उल्हासनगर - कुमार आयलानी, पेण - रविंद्र पाटील, खडकवासला - भिमराव तापकीर, पुणे कॅन्टोन्मेंट - सुनील कांबळे, कसबा पेठ - हेमंत रासने, लातूर ग्रामीण - रमेश कराड, सोलापूर शहर मध्य - देवेंद्र कोठे, पंढरपूर - समाधान आवताडे, शिराळा - सत्यजित देशमुख, जत - गोपीचंद पडळकर यांचा समावेश आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी