पंढरपूर आषाढी वारीदरम्यान अपघात किंवा मृत्यू झाल्यास सरकार देणार ४ लाखांची मदत
मुंबई, 1 जुलै (हिं.स.)।महाराष्ट्राचा आध्यात्मिक उत्सव मानला जाणारा पंढरपूर आषाढी वारी सोहळा सध्या उत्साहात सुरू आहे.अशातच आता वारकऱ्यांसाठी सरकारने आनंदाची बातमी जाहीर केली आहे. वारीदरम्यान कुठल्याही कारणाने वारकऱ्याचा मृत्यू झाल्यास सरकारकडून चार ला
Ashadhi vari


मुंबई, 1 जुलै (हिं.स.)।महाराष्ट्राचा आध्यात्मिक उत्सव मानला जाणारा पंढरपूर आषाढी वारी सोहळा सध्या उत्साहात सुरू आहे.अशातच आता वारकऱ्यांसाठी सरकारने आनंदाची बातमी जाहीर केली आहे. वारीदरम्यान कुठल्याही कारणाने वारकऱ्याचा मृत्यू झाल्यास सरकारकडून चार लाखाची मदत मिळणार आहे. वारकऱ्यासंदर्भात सरकारकडून नवे परिपत्रक जाहीर करण्यात आले आहे.

पंढरपूर येथे वारीसाठी येणाऱ्या वारकऱ्यांसाठी विठ्ठल रखुमाई वारकरी योजना-2025 राबविण्यात येत आहे. वारीदरम्यान कुठल्याही कारणाने वारकऱ्याचा मृत्यू झाल्यास सरकारकडून चार लाखाची मदत मिळणार आहे.वारकऱ्यासंदर्भात सरकारकडून नवे परिपत्रक जाहीर करण्यात आले आहे.यामध्ये जर वारीदरम्यान कुठलाही अपघात झाला आणि 60 टक्के होऊन अधिक अपंगत्व आल्यास अडीच लाखाची मदत सरकार देणार आहे. 60% पेक्षा कमी अपंगत्व आल्यास सरकारकडनं 74 हजाराची मदत मिळणार आहे.

दरम्यान, लाखो वारकरी टाळ-मृदुंगाच्या गजरात आणि 'जय हरी विठ्ठल'च्या जयघोषात श्री विठ्ठल-रखुमाईच्या दर्शनासाठी पंढरपूरच्या दिशेने पायी प्रवास करत आहेत. ही परंपरा 800 वर्षांहून अधिक काळापासून अव्याहतपणे सुरू असून, यंदा 6 जुलै 2025 रोजी आषाढी एकादशीला हा सोहळा पंढरपुरात संपन्न होणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande