शेतीच्या वादातून खून; एकाला जन्मठेप
सोलापूर, 26 ऑक्टोबर (हिं.स.)।शेतीच्या वादातून खून केल्याप्रकरणी बार्शी न्यायालयाचे जिल्हा न्यायाधीश एल.एस चव्हाण यांनी माढा तालुक्यातील एकाला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तर चौघांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली. हनुमंत दगडू कोळेकर (रा. फूट
शेतीच्या वादातून खून; एकाला जन्मठेप


सोलापूर, 26 ऑक्टोबर (हिं.स.)।शेतीच्या वादातून खून केल्याप्रकरणी बार्शी न्यायालयाचे जिल्हा न्यायाधीश एल.एस चव्हाण यांनी माढा तालुक्यातील एकाला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तर चौघांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली. हनुमंत दगडू कोळेकर (रा. फूटजवळगाव ता माढा) असे जन्मठेपेची शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. तर बायडाबाई हनुमंत कोळेकर, दत्तात्रय कृष्णा हांडे, अजिनाथ ज्ञानदेव हांडे व हरिदास जनार्दन हांडे यांची पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली.माढा तालुक्यातील फूटजवळगाव येथील शेतकरी चंद्रकांत हांडे हे ५ आक्टोंबर २०१९ रोजी सकाळी १०.४५ च्या सुमारास ज्वारी पेरण्यासाठी आपल्या शेतात गेले होते. यावेळी बायडाबाई कोळेकर ही शेतात येणाऱ्या ट्रॅक्टरवर दगड मारून शिवीगाळ करू लागली व ते तिथेच उभा असलेला हनुमंत दगडू कोळेकर हा चंद्रकांत हांडे यांना जमीन कशी घेतो ते पाहतो, असे म्हणून शिवीगाळ करू लागला. तेव्हा तिथेच उभे असलेले हनुमंत कोळेकर याचे नातेवाईक दत्तात्रय हांडे, अजिनाथ हांडे व हरिदास हांडे यांनी त्याला आज सोडू नको. काही घडल्यास आम्ही पाहतो, असे कोळेकर याला म्हटले. त्यानंतर कोळेकर याने कुऱ्हाडीने चंद्रकांत हांडे यांचा खून केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande