रुद्र मेणेचे तडाखेबंद नाबाद त्रिशतक
नाशिक, 29 ऑक्टोबर (हिं.स.)। नाशिक जिल्हा क्रिकेट संघटना आयोजित , १४ वर्षांखालील मान्सून लीग२०२४-२५क्रिकेट स्पर्धा रंगत असून , एम सी सी संघाकडून खेळताना रुद्र मेणेने तडाखेबंद नाबाद त्रिशतक झळकवले. महात्मा नगर १ क्रिकेट मैदानावर पिंगळे क्रिकेट अकादमी व
रुद्र मेणेचे तडाखेबंद नाबाद त्रिशतक


नाशिक, 29 ऑक्टोबर (हिं.स.)। नाशिक जिल्हा क्रिकेट संघटना आयोजित , १४ वर्षांखालील मान्सून लीग२०२४-२५क्रिकेट स्पर्धा रंगत असून , एम सी सी संघाकडून खेळताना रुद्र मेणेने तडाखेबंद नाबाद त्रिशतक झळकवले. महात्मा नगर १ क्रिकेट मैदानावर पिंगळे क्रिकेट अकादमी विरुद्ध सलामीला येत रुद्र मेणेने केवळ १७४ चेंडूत नाबाद ३०१ धावा फटकावल्या. यात ४६ चौकार व ३ षटकारांचा समावेश होता. या फलंदाजीच्या जोरावर एम सी सी ने ५ बाद ५२५ असा धावांचा डोंगर उभा केला. त्यानंतर पिंगळे क्रिकेट अकादमीला ४१ धावांत सर्वबाद करत ४८४ धावांनी प्रचंड मोठा विजय मिळवला. एम सी सी संघाकडून इशान कार्लेकरने ४, संग्राम मोराडेने ३ व तनिष पवारने २ गडी बाद केले.

तर इगतपुरी विरुद्धच्या सामन्यात एन एस एन सी सीच्या आयुष दिनगरने एका डावात ५ बळी घेत संघाला ९ गडी राखून मोठा विजय मिळवू दिला.त्यास अद्वैत सुर्वेने ३ व प्रज्वल सांगळे नी २ गडी घेत साथ दिली.

नाशिकमधील एकूण १४ संघांचा या स्पर्धेत सहभाग असून आतापर्यंत यात सहा सामने झाले आहेत. यात एस जी सी ए , भूमि, यु सी ए , एम व्ही पी , एम सी सी व एन एस एन सी सी या संघांनी आपले सामने जिंकले आहेत. यात गोलंदाजीतएन एस एन सी सीच्या आयुष दिनगरने एका डावात ५ तर ऋतुज कापडणे, देवांश गवळी , कल्याणी कुटे , इशान कार्लेकर, व फलक मोहोळकर यांनी ४ बली घेण्याची प्रभावी कामगिरी केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / CHANDRASHEKHAR SUKHDEV GOSAVI


 rajesh pande