बीड - क्रीडा महोत्सवात खो-खो स्पर्धेचे उद्घाटन
बीड, 02 जानेवारी (हिं.स.)। शिक्षण क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये शिवछत्र परिवाराने मोठी चळवळ उभी केली, तो वसा आणि चारसा सक्षमपणे रणवीर पंडित पुढे घेऊन जात असताना त्यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दिलेल्या संधीचे ग्रामीण खेळाडूंनी सोने के
बीड


बीड, 02 जानेवारी (हिं.स.)। शिक्षण क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये शिवछत्र परिवाराने मोठी चळवळ उभी केली, तो वसा आणि चारसा सक्षमपणे रणवीर पंडित पुढे घेऊन जात असताना त्यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दिलेल्या संधीचे ग्रामीण खेळाडूंनी सोने केले असे गौरवोद्‌गार बाजार समितीचे उपसभापती श्रीहरी पवार यांनी काढले.

जयभवानी आणि जगदंबा शिक्षण प्रसारक मंडळ अंतर्गत सुरू असलेल्या क्रोडा महोत्सवात मुलांच्या गटात खो-खो स्पर्धेचे तद्घाटन करताना ते बोलत होते.

शारदा स्पोर्ट्स अकॅडमीचे अध्यक्ष रणवीर पंडित यांच्या संकल्पनेतून जयभवानी आणि जगदंबा शिक्षण प्रसारक मंडळाच्या अंतर्गत भव्य शारदा

क्रीडा महोत्सव सुरू असून माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय पाचेगाव येथे मुलांच्या गटातील खो खो स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले, यावेळी बाजार समितीचे उपसभापती श्रीहरी पवार संचालक, पांडुरंग मुळे, प्राचार्य राजेंद्र दाभाडे, सरपंच तुकाराम प्रधान, वराट, बिपीन डरपे, देविदास तर्फे, भागवानराव मते, श्रीकृष्ण वेताळ, मुन्ना हटवटे, पांडुरंग मुसळे, कृष्णा चव्हाण, अविनाश राठोड यांच्यासह मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात आयोजक रणवीर पंडित म्हणाले की, क्रीडा महोत्सवात सातत्य ठेवून स्पर्धा आयोजित केल्यामुळे ग्रामीण भागातील विद्याध्यांमध्ये खेळाची आवड निर्माण झाली, त्यामुळे त्याला चार वर्षापासून होणाऱ्या या क्रीडा महोत्सवाला उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे, यावेळी बोलताना प्राचार्य राजेंद्र दाभाडे म्हणाले गेवराई तालुक्यामध्ये जयभवानी जगदंबा शिक्षण संस्थेने शैक्षणिक संस्थेमुळे शैक्षणिक चळवळ गतिमान झाले. शारदा क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून रणवीर पंडित यांनी ग्रामीण भागातील विद्याथ्यर्थ्यांना खेळण्यासाठी प्रोसाहित केले. या निमित्ताने ग्रामीण भागात मैदाने उपलब्ध झाले. यातून चांगले खेळाडू घडतील आणि गेवराई तालुक्याचा नावलौकिक होईल असेही ते यावेळी म्हणाले.

प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते क्रीडा ध्वजारोहण, दिपप्रज्वलन करुन कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. मैदानाचे पुजन करून उपस्थित मान्नगवरांनी खेळाडूंचा परिचय करून घेतला. यावेळी मुलांच्या गटात देन मैदानावर सामने सुरु करण्यात आले. खो-खो स्पर्धेत संस्थेच्या आठरा शाळेचे संघ सहभागी झाले आहेत, यावेळी जयभवानी व जगदंबा शिक्षण संस्थेतील मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी खेळाडू तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते, क्रीडा प्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande