चंद्रपूर : ऑलम्पिकवीर खाशाबा जाधव यांचा जन्मदिन राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा होणार
चंद्रपूर, 02 जानेवारी (हिं.स.)। राज्य शासनाच्या निर्देशान्वये 15 जानेवारी हा दिवस ऑलम्पिकवीर दिवंगत खाशाबा जाधव यांचा जन्मदिन राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे. स्वतंत्र भारताचे पहिले ऑलम्पिक पदक विजेते महाराष्ट्राचे सुपुत्र दिवंगत खाशा
चंद्रपूर : ऑलम्पिकवीर खाशाबा जाधव यांचा जन्मदिन राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा होणार


चंद्रपूर, 02 जानेवारी (हिं.स.)। राज्य शासनाच्या निर्देशान्वये 15 जानेवारी हा दिवस ऑलम्पिकवीर दिवंगत खाशाबा जाधव यांचा जन्मदिन राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे. स्वतंत्र भारताचे पहिले ऑलम्पिक पदक विजेते महाराष्ट्राचे सुपुत्र दिवंगत खाशाबा जाधव यांचा जीवनातून नवोदित खेळाडूंना दर्जेदार कामगिरी करण्यासाठी प्रेरणा व प्रोत्साहन मिळावे, यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या व शासनमान्य खाजगी शाळा, महाविद्यालय, विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालय, क्रीडा संघटना-असोशिएसन, क्रीडा मंडळे, क्रीडा अकादमी, शासनाच्या क्रीडा योजनांचा लाभ-अनुदान मिळालेल्या सर्व संस्था, अन्य संस्था व मंडळे यांनी राज्य क्रीडा दिनाचे आयोजन करावे, असे निर्देश प्राप्त झाले आहेत.

याअंतर्गत खाशाबा जाधव यांची जीवनगाथा व त्यांचे क्रीडा क्षेत्रातील योगदान या विषयावरील व्याख्यानांचे आयोजन करावे. प्रा.संजय दुधाने लिखित ‘ऑलम्पिकवीर खाशाबा जाधव’ हे पुस्तक प्रत्येक शाळा महाविद्यालयांच्या ग्रंथालयात खेळाडूंना वाचनासाठी उपलब्ध असावेत. क्रीडा संस्कृतीचे जतन व संवर्धन करण्यासाठी रॅलीचे -मॅरेथान स्पर्धांचे आयोजन करावे. शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध खेळासंदर्भातील नियमावली, आलिंपिक स्पर्धासोबतच अन्य महत्वाच्या स्पर्धा, त्यामधील यशस्वी खेळाडू व अन्य बाबी यांची प्राथमिक माहिती देण्यासाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन तसेच ऑनलाईन संपर्क माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांचा नामवंत खेळाडूंसोबत संवाद साधावा असे स्पष्ट करण्यात आलेले आहे.

विविध खेळांचे प्रदर्शनीय सामने व विजेत्यांना पुरस्कार वितरण, आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय खेळाडूंचा गौरव, क्रीडा क्षेत्रातील यशवंत खेळाडू, प्रशिक्षक तसेच क्रीडा क्षेत्रातील व्यक्ती यांच्या उपस्थितीत नवोदित खेळाडू, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थीनी, पालक, क्रीडा प्रेमी, नागरिक यांच्यासोबत क्रीडा क्षेत्रातील करीअर संधीबाबत परिसंवाद व चर्चासत्रे आयोजित करावे. यशस्वी क्रीडा विषयक उपक्रम तसेच क्रीडा सुविधांनी युक्त क्रीडा संकुल, अकादमी संस्था यांना भेटी देणे व आपल्या स्तरावर क्रीडा विषयक अभिनव उपक्रम राबविण्यात यावे व अहवाल जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाला सादर करावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव


 rajesh pande