रत्नागिरी : फ्रेंड्स ग्रुपतर्फे शुक्रवारी वार्षिक दीपोत्सव
रत्नागिरी, 30 ऑक्टोबर, (हिं. स.) : लांजा येथील फ्रेंड्स ग्रुपतर्फे दिवाळीचे औचित्य साधून येत्या शुक्रवारी (दि. १ नोव्हेंबर) सायंकाळी ७ वाजता न्यू इंग्लिश स्कूलच्या पटांगणावर वार्षिक दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी १९ हजार दीप एकाचवेळी प्रज
रत्नागिरी : फ्रेंड्स ग्रुपतर्फे शुक्रवारी वार्षिक दीपोत्सव


रत्नागिरी, 30 ऑक्टोबर, (हिं. स.) : लांजा येथील फ्रेंड्स ग्रुपतर्फे दिवाळीचे औचित्य साधून येत्या शुक्रवारी (दि. १ नोव्हेंबर) सायंकाळी ७ वाजता न्यू इंग्लिश स्कूलच्या पटांगणावर वार्षिक दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

यावेळी १९ हजार दीप एकाचवेळी प्रज्वलित करण्यात येणार आहेत.. फ्रेंड्स ग्रुपतर्फे साजरा करण्यात येणारा दीपोत्सव कोकणातील सर्वांत मोठा दीपोत्सव म्हणून ओळखला जातो. दीपावलीचे सांस्कृतिक महत्त्व लक्षात घेऊन देशभरात विविध ठिकाणी दीपोत्सवाचे आयोजन करण्यात येते. प्रभू श्रीराम जन्मभूमी अयोध्येसह पुण्यातील शनिवारवाडा, कोल्हापुरातील रंकाळा येथे होणारे दीपोत्सव लोकप्रिय आहेत. याच पंक्तीत गेली १९ वर्षे सातत्यपूर्वक दीपोत्सवाचे आयोजन लांजा शहरात केले जात आहे. तो महाराष्ट्रातील तृतीय क्रमांकाचा दीपोत्सव ठरला आहे.

दीपोत्सवाच्या निमित्ताने लांजा तालुक्याचे नाव मोठे करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वांना व संस्थांना फ्रेन्डसरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. यंदा मुंबईसह राष्ट्रीय-अनंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकीक मिळविणाऱ्या टेक्नो सोल्यूशन प्राय. लिमिटेडचे डायरेक्टर व लांज्याचे सुपुत्र शशिकांत काशिराम गुरव, राजापूर तालुक्यात अल्पावधीतच महावितरण ठेकेदार म्हणून आपल्या सहकार्यशील स्वभावाने मोठा लोकसंग्रह गोळा करणारे माया इलेक्ट्रिक फर्मचे रूपेश बाबल्या कांबळे, शिक्षण क्षेत्रात दोन दशकांहून अधिक काळ क्रियाशील शिक्षक म्हणून मुद्रा उमटविणारे दीपक नागवेकर यांना फ्रेंडस् रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / बाळकृष्ण कोनकर


 rajesh pande