मुंबई, 30 ऑक्टोबर, (हिं.स.)। पर्वती विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार आबा बागुल यांनी बुधवारी हजारो कार्यकर्ते व नागरिकांच्या उपस्थितीत आपल्या प्रचार रॅलीचा धुमधडाक्यात प्रारंभ केला. काँग्रेस भवन येथून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या रॅलीची सुरवात केली. यावेळी उपस्थितांनी श्री बागुल यांचा प्रचंड मतांनी विजय करण्याचा निर्धार व्यक्त केला.
प्रारंभी पासून काँग्रेसचे निष्ठावंत असलेल्या श्री बागुल यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला असला तरी, त्यांनी आपल्या प्रचाराची सुरुवात काँग्रेस भवन येथूनच केली. अजय खुडे, विश्वास दिघे,इंदिरा आहिरे,जयकुमार ठोंबरे, शोभा पण्णीकर, संतोष गेळे, बेबी राऊत, गोरख मरळ, अशोक नेटके, सुमन इंगवले, ज्योती आरवेन, नीता नेटके, शाम काळे, दीपक ओव्हाळ, छाया गाडे, ताई कसबे, नंदा ढावरे, प्रकाश आरणे, रावसाहेब खवळे, जावेद शेख, माहेबूब शेख, अल्ताप सौदागर, नितीन निकम, मनीषा गायकवाड, सुनील ओव्हाळ, काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.
श्री आबा बागुल यांच्या प्रचारार्थ दुचाकी रॅलीचे बुधावरी सकाळी आयोजन करण्यात आले. सकाळी दहा वाजता शिवदर्शन येथील राजीव गांधी अकॅडमी ऑफ ई लर्निंग येथून ही दुचाकी रॅली सुरू झाली. या रॅलीत तरुणाई बरोबरच ज्येष्ठ नागरिक, महिला ही मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. यावेळी आबा बागुल हम तुम्हारे साथ हे च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. दरम्यान पर्वती मतदार संघातील काँग्रेसचे शेकडो निष्ठावंत कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. आबा तुम्ही घेतलेली भूमिका अत्यंत योग्य आहे. आम्ही आपल्या मागे खंबीरपणे उभे आहोत, तुमचा विजय निश्चित आहे, आशा भावना त्यांनी यावेळी बोलून दाखविल्या.
ही बाईक रॅली राजीव गांधी अकॅडमी ऑफ ई लर्निंग - लक्ष्मी नगर – पर्वती गाव – जनता वसाहत – हिंगणे – महादेवनगर – आनंदनगर – विठ्ठलवाडी – दत्तवाडी – गणेशमळा -पानमळा - दांडेकर पूल – निलायम ब्रिज येथून पुढे पर्वती दर्शन येथे समाप्त झाली. वाहतुकीला अडथळा येऊ नये अशा पद्धतीने रस्त्यावरून या बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
पर्वती मतदार संघातील परिवर्तनासाठी या बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. अशा भावना श्री आबा बागुल यांनी यावेळी व्यक्त केल्या. तसेच आपला विजय निश्चित असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. आपण काँग्रेसचे विचार जे महात्मा गांधी यांनी दिले ते कायम पुढे ठेवण्यासाठी हे पाऊल उचलले असल्याचे सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर