रत्नागिरी जिल्हा उद्योग केंद्रातर्फे शनिवारी निर्यात प्रचालन कार्यशाळा
रत्नागिरी, 2 जानेवारी, (हिं. स.) : जिल्हा उद्योग केंद्रामार्फत जिल्ह्यातील निर्यात प्रचालन कार्यशाळा शनिवारी ४ जानेवारी रोजी सकाळी ९ वा अल्पबचत भवनात होणार आहे. उद्योगमंत्री उदय सामंत याच्या अध्यक्षतेखाली आणि विकास आयुक्त (उद्योग) दिपेंद्र सिंह कुश
रत्नागिरी जिल्हा उद्योग केंद्रातर्फे शनिवारी निर्यात प्रचालन कार्यशाळा


रत्नागिरी, 2 जानेवारी, (हिं. स.) : जिल्हा उद्योग केंद्रामार्फत जिल्ह्यातील निर्यात प्रचालन कार्यशाळा शनिवारी ४ जानेवारी रोजी सकाळी ९ वा अल्पबचत भवनात होणार आहे.

उद्योगमंत्री उदय सामंत याच्या अध्यक्षतेखाली आणि विकास आयुक्त (उद्योग) दिपेंद्र सिंह कुशवाह तसेच जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा होणार असल्याची माहिती जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अजिंक्य आजगेकर यांनी दिली.

उद्योग विकास आयुक्तांच्या निर्देशानुसार राज्यामध्ये निर्यात क्षेत्रास प्रोत्साहन देण्यासाठी तसेच रोजगार निर्मितीचे लक्ष्य साध्य करण्यासाठी आणि निर्यात वाढीला प्रत्येक जिल्ह्याला उत्तरदायी बनवण्यासाठी राज्याकडून केंद्र शासनाच्या जिल्हा हे निर्यात केंद्र उपक्रमाला प्रोत्साहन देण्याकरिता राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये निर्यात प्रचालन कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहे. रत्नागिरीतील कार्यक्रमास सूक्ष्म, लघु व मध्यम उपक्रम घटक निर्यातदार, निर्यातक्षम उद्योजक, नवउद्योजक, औद्योगिक संस्था व संघटना, औद्योगिक समूह, औद्योगिक वसाहती, शेतकरी सहकारी संस्था व उत्पादक, प्रक्रिया उत्पादक, केंद्र व राज्य शासनाचे तसेच संबंधित उपक्रमाचे अधिकारी, जिल्हा निर्यात प्रचालन समितीचे सदस्य, निर्यात संबंधित कामकाज करणारे घटक यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्र महाव्यवस्थापक अजिंक्य आजगेकर यांनी केले आहे.

कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यासाठी DGFT, FIEO, MPEDA, INDIA POST इत्यादी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

हिंदुस्थान समाचार / बाळकृष्ण कोनकर


 rajesh pande