धमकी प्रकरणी आमदार सुहास कांदेंविरोधात गुन्हा दाखल
नांदगाव, 30 ऑक्टोबर (हिं.स.)। – नांदगाव विधानसभा मतदार संघातील शिवसेना शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांच्या विरोधात शिवीगाळ आणि धमकी दिल्याप्रकरणी दोन गुन्हे दाखल झाले आहे. आमदार कांदे यांनी मराठा समाजाचे नेते शेखर पगार आणि समीर भुजबळ यांचे समन्व
धमकी प्रकरणी आमदार सुहास कांदेंविरोधात गुन्हा दाखल


नांदगाव, 30 ऑक्टोबर (हिं.स.)।

– नांदगाव विधानसभा मतदार संघातील शिवसेना शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांच्या विरोधात शिवीगाळ आणि धमकी दिल्याप्रकरणी दोन गुन्हे दाखल झाले आहे. आमदार कांदे यांनी मराठा समाजाचे नेते शेखर पगार आणि समीर भुजबळ यांचे समन्वयक विनोद शेलार यांना शिवीगाळ व धमकी दिली होती. त्यानंतर याप्रकरणी दोघांनी मंगळवारी रात्री आमदार कांदे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर हे वेगवेगळे दोन गुन्हे नांदगाव पोलिस स्थानकात दाखल झाले.

दोन दिवसापूर्वी शेखर पगार यांनी अपक्ष उमेदवार समीर भुजबळ यांच्या सभेत भाषण केले होते. त्यांचे भाषण संपताच आमदार कांदे यांनी त्यांना फोन करुन धमकी व शिवीगाळ केली. या फोनमधील संवाद पगार यांच्या फोनवर रेकॅार्ड झाला. त्यानंतर त्यांनी सभेतच तो सर्वांना एेकवला. तर दुस-या घटनेत समीर भुजबळ यांचे समन्वयक विनोद शेलार यांना आमदार कांदे यांनी तहसिल कार्यालयाबाहेर धमकी दिली. त्याचा व्हिडिओही व्हायरल झाला होता. या दोन्ही प्रकरणात कारवाई करण्याची मागणी समीर भुजबळ यांनी केली होती.

नांदगाव विधानसभा मतदार संघात आमदार सुहास कांदे हे महायुतीचे उमेदवार आहे. तर महाविकास आघाडीतर्फे ठाकरे गटाचे उमेदवार गणेश धात्रक आहे. याच मतदार संघात माजी खासदार समीर भुजबळ यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / CHANDRASHEKHAR SUKHDEV GOSAVI


 rajesh pande