अमरावती, ऑक्टोबर (हिं.स.): मेळघाटाच्या इतिहासात प्रथमच आदिवासी गावातील नागरिकांनी गांधी जयंती निमित्त दारूबंदीचा ठराव करून धारणी पोलिसांना कारवाईचे निवेदन दिले. धारणीचे ठाणेदार अशोक जाधव यांनी निवेदन प्राप्त होताच तातडीने बासपाणी गावातील गावठी अड्ड्यावर धाड घालून तब्बल २ लाख १२ हजार रुपए किमतीची गावठी दारू व दारू बनविण्याचे साहित्य जप्त केले. पोलिसांच्या या कारवाईमुळे गावातील महिला, पुरूष नागरिकांनी पोलिसांवर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.धारणीपासून नजीक असलेल्या बासपाणी गावात मोठया प्रमाणात गावठी दारूची निर्मिर्ती व विक्री करण्यात येत होती. यामुळे गावातील लोकांची, युवकांची दारू पिण्याचे प्रमाण वाढले होते. अति दारू सेवनामुळे अनेकांना आपला जीव गमवाला लागला, कित्येक कुटूंब उघडयावर पडले. त्यामुळे गावातीलनागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांना दोन प महिन्यापूर्वी निवेदन देऊन गावात ग दारूबंदीची मागणी केली होती. तसेच घ बासपाणी गावातील सर्व महिला, स पुरूषांनी आज २ ऑक्टोंबर गांधी प जयंतीदिनी गावातील चावडीवर सभा घेऊनदारूबंदीचा ठराव घेतला तसेच धारणी पोलिस ठाण्यात ठाणेदार अशोक जाधव यांना दारूबंदीबाबत कारवाईचे निवेदन दिले. आदिवासी नागरिकांचेनिवेदन मिळताच ठाणेदार अशोक जाधव यांनी तात्काळ पथकासह बासपाणी गाव गाठून गावठी दारूच्या अड्डयांवर धाडी घातल्या. पोलिसयेत असल्याचे पाहून सर्व आरोपी फरार झाले. त्यामुळे पोलिसांनी दोन्ही गावठी दारू अड्डड्यांवरून तब्बल २ लाख १२ हजार रुपए किमतीची गावठी दारू व दारू बनविण्याचे साहित्य, भांडे जप्त केले. याबाबत धारणी पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलिस पुढील तपास करित आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी