मुंढवा घोटाळा 300 कोटींचा-विजय कुंभार
पुणे, 05 जानेवारी (हिं.स.)। नुकत्याच गाजलेल्या मुंढवा जमीन व्यवहारात झालेल्या करारामध्ये साक्षीदार असलेला एक जण आणि इतर काही सदस्यांच्या संगनमताने ३०० कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी सोमवारी पत्रकार परिष
मुंढवा घोटाळा 300 कोटींचा-विजय कुंभार


पुणे, 05 जानेवारी (हिं.स.)।

नुकत्याच गाजलेल्या मुंढवा जमीन व्यवहारात झालेल्या करारामध्ये साक्षीदार असलेला एक जण आणि इतर काही सदस्यांच्या संगनमताने ३०० कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला.

ते म्हणाले, ‘या भूखंडावर एक प्रकल्प उभारण्यात आला आहे. तेथे एका संस्थेचे कार्यालय स्थापण्यात आले असून, प्रकल्पातील इतर मालमत्तांची चालू बाजारभाव मूल्यानुसार (रेडी रेकनर)विक्री करण्यात आली आहे. मुंढवा जमीन व्यवहारात झालेल्या करारामध्ये साक्षीदार असलेला एक जण आणि इतर काही सदस्यांची नावे या प्रकरणातही आढळून येत आहेत.

कुंभार म्हणाले, ‘पुण्यातील शिवाजीनगर येथील सुमारे दोन एकराचा भूखंड धर्मादाय आयुक्तालयाकडून ६० वर्षांच्या दीर्घ मुदतीवर एका कंपनीला देण्यात आला. कालांतराने या ठिकाणच्या १५ हजार चौरस फूट जागेवर चटई क्षेत्र निर्देशांक (एफएसआय) वाढवून ६३ हजार चौरस फुटांचे बांधकाम असलेली इमारत उभारण्यात आली. महारेराकडे याची नोंदही उपलब्ध आहे. वास्तविक धर्मादाय ट्रस्टची जागा भाडेपट्ट्याने देण्यात आली असताना, या जागेचे अन्य एक संस्था आणि नंतर पुन्हा अन्य एक कंपनी असे हस्तांतर दाखविण्यात आले. तसेच, जागा विक्री करण्याचा कोणताही अधिकार नसताना संबंधित कंपनीने या जागेवरील सहा मजले परस्पर विकले. याची किंमत ३०० कोटींपेक्षा जास्त आहे.’

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande