रत्नागिरी, 19 नोव्हेंबर, (हिं. स.) : येथील गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या पुरुष फुटबॉल संघाने मुंबई विद्यापीठ कोकण झोन पुरुष फुटबॉल स्पर्धेचे उपविजेतपद मिळवले. मुंबई विद्यापीठ, मुंबई व कोकण झोन आणि देवगड येथील एस. एच केळकर आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा झाली.
स्पर्धेत गोगटे जोगळेकर महाविद्यालय पुरुष फुटबॉल संघाने कोकण झोन पुरुष फुटबॉल स्पर्धेत रौप्यपदक पटकावले. स्पर्धेत पुरुष फुटबॉल संघात तुषार कांबळे, आर्यन जाधव, अनुज पुजारी, निखिल खेत्री, विवेक बेद्रे, आयान बावडे, भूषण जाधव, आश्रय शिंदे, आयुष वेलणकर, अथर्व म्हस्के, मानोजसिंग पुरोहित, मयुरेश पिलणकर, विशाल परीहार, गुरुप्रसाद कोतवडेकर या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाचे प्रतिनिधित्व केले होते.
या संघाचे अभिनंदन रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा शिल्पाताई पटवर्धन, कार्यवाह सतीश शेवडे, जिमखाना समितीचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर केळकर, प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, उपाध्यक्ष डॉ. विवेक भिडे, क्रीडा संचालक डॉ. विनोद शिंदे, क्रीडा शिक्षक प्रा. कल्पेश बोटके यांनी केले.
हिंदुस्थान समाचार / बाळकृष्ण कोनकर