सातारा - रायफल शूटिंग स्पर्धेत के.एस.डी. शानभाग विद्यालयाच्या खेळाडूंचे घवघवीत यश 
सातारा, 20 नोव्हेंबर (हिं.स.)।कोल्हापूर विभागीय शालेय रायफल शूटिंग क्रीडा स्पर्धेचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते .या अंतर्गत दहा मीटर ओपन साईट एअर रायफल शूटिंग स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धा प्रकारात 17 वर्षाखालील गटात के. एस .डी. शानभाग विद्याल
Satara


सातारा, 20 नोव्हेंबर (हिं.स.)।कोल्हापूर विभागीय शालेय रायफल शूटिंग क्रीडा स्पर्धेचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते .या अंतर्गत दहा मीटर ओपन साईट एअर रायफल शूटिंग स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धा प्रकारात 17 वर्षाखालील गटात के. एस .डी. शानभाग विद्यालय जुनियर कॉलेजच्या इयत्ता आठवीत शिकणाऱ्या रितेश जांगिड यांनी सुवर्णपदक पटकावले ,तर 19 वर्षाखालील गटामध्ये श्रवण चव्हाण यांनीही रौप्य पदक पटकावले. याच विद्यालयातील दहावीत शिकणाऱ्या सर्वेश जोशी यांनी कास्यपदक प्राप्त केले आहे. शालेय अभ्यासाबरोबरच दिवसातून तीन ते चार तास परिश्रम करून त्यांनी हे संपादन केले आहे या प्रयत्नांना त्यांच्या प्रशिक्षिका दिशा इंदलकर यांचे योग्य मार्गदर्शन लाभले.

या यशाबद्दल महाविद्यालयाचे संस्थापक व ज्येष्ठ क्रीडा मार्गदर्शक रमेश शानभाग, संचालिका सौ, अचल घोरपडे, विश्वस्त सौ, उषा शानभाग, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ .रेखा गायकवाड, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक भाग्येश कुलकर्णी, क्रीडा विभाग प्रमुख अभिजीत मगर सर पालक संघाचे प्रतिनिधी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून या यशस्वी खेळाडूंना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande