अहमदनगर, 19 नोव्हेंबर (हिं.स.):- अहमदनगर शहरातील वाडिया पार्क क्रीडा संकुल येथे झालेल्या खुल्या जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत दौंड रोड वरील अरणगाव येथील झी स्कूल चा विद्यार्थी अंश अविनाश मुदळ याने १९ किलो वजन गटातील स्पर्धेत ब्राँझ (कास्य) मेडल मिळविले.
या स्पर्धेत जिल्हाभरातील स्पर्धकांनी भाग घेतला होता.तायक्वांदो हा आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळला जाणारा खेळ आहे.या क्रीडा प्रकारामुळे स्वरक्षणाचे धडे मिळतात. शारीरिक कौशल्ये वाढतात व फिटनेस चांगला राहून शालेय वयातच विद्यार्थ्यां ची शारीरिक वाढ चांगली होते.निरोगी शरीरामुळे मन निरोगी राहते व त्याचा फायदा अभ्यासात देखील होतो.या विद्यार्थ्याचा शाळेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष सुनील लोटके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.प्राचार्या शैलजा लोटके यांनी त्यांचे अभिनंदन केले.
हिंदुस्थान समाचार / Shirish Kulkarni