धुळे, 29 नोव्हेंबर (हिं.स.) क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्यावतीने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, धुळे मार्फत आयोजित
राज्यस्तरीय शालेय कराटे क्रीडा स्पर्धा सन 2024-25 चे उद्घाटन जिल्हा क्रीडा संकुलातील इनडोअरहॉल मध्ये आमदार सौ. मंजुळाताई गावित, आमदार अनुपभैय्या अग्रवाल, डॉ. तुळशिराम गावीत, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश टिळे, अलाऊद्दीन अन्सारी, अध्यक्ष, महाराष्ट्र डू कराटे असोसिएशन
ऑफ महाराष्ट्र, संदीप गाडे, जनरल सेक्रेटरी, महाराष्ट्र डु कराडे असोसिएशन, संभाजी अहिरराव, उमेश
चौधरी, डॉ. प्रशांत सांळखे, अँड. दुष्यंतराजे देशमुख यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करुन करण्यात आले.
यावेळी या स्पर्धेसाठी आलेल्या खेळाडूांना शपथ देऊन स्पर्धा सुरु करण्यात आली.
राज्यस्तरीय कराटे क्रीडा स्पर्धाचे आयोजन 14, 17 व 19 वर्ष आतील मुले व मुली या
वयोगटाचे आयोजन करण्याचा मान धुळे जिल्ह्यास मिळाला आहे. या स्पर्धा जिल्हा क्रीडा संकुल, धुळे येथे संपन्न होणार आहे. या स्पर्धेसाठी आठ विभागातुन प्रत्येक विभागातुन 69 खेळाडु व 6 व्यवस्थापक असे एकुण 75 खेळाडु व्यवस्थापकासह
राज्यस्तरीय स्पर्धेत 568 स्पर्धेक सहभागी होणार आहेत. सदर स्पर्धेत सुवर्ण पदक प्राप्त खेळाडू राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघातुन सहभागी झाले आहे.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन एम के पाटील, क्रीडा अधिकारी यांनी केले. राज्यस्तरीय शालेय कराटे क्रीडा स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश टिळे यांच्यामार्गदर्शनाखाली संभाजी अहिराव, अध्यक्ष, धुळे जिल्हा कराटे संघटना, अॅड. दुष्यंतराजे देशमुख,
अध्यक्ष, धुळे कराटे ऑर्गनायझेशन, अमोर अहिरे, प्रशिक्षक, संदिप बाविस्कर, प्रशिक्षक व इतर धुळे
जिल्ह्यात कार्यरत सर्व कराटे असोसिएशनचे पदाअधिकारी, क्रीडा अधिकारी कार्यालयातील एम के
पाटील, क्रीडा अधिकारी, रेखा पाटील, स्पनिल बोडे, श्र्वेता गवळी, योगेश्वरी मिस्तरी, मुद्राअग्रवाल, मयुरी पवार गौरव परदेशी, योगेश देवरे, श्रीधर कोठावदे, मदन गावीत, ज्ञानेश्वर जाधव,
राहुल देवरे, योगेश पाटील, चेतन धिवरे, दिनेश शिरसाठ हे स्पर्धा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत
असल्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश टिळे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर