सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी उमेश तोरसकर
सचिवपदी बाळ खडपकर यांची निवड सर्वसाधारण सभेत नूतन कार्यकारिणीची बिनविरोध निवड सिंधुदुर्ग, 29 नोव्हेंबर (हिं.स.)। : सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाच्या २०२४ ते २०२६ या कालावधीसाठी नूतन कार्यकारिणीची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. आज सिंधुदुर्गनगरी य
सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार समितीच्या नूतन कार्यकारणीचे अभिनंदन करताना पत्रकार सदस्य.


सचिवपदी बाळ खडपकर यांची निवड

सर्वसाधारण सभेत नूतन कार्यकारिणीची बिनविरोध निवड

सिंधुदुर्ग, 29 नोव्हेंबर (हिं.स.)। : सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाच्या २०२४ ते २०२६ या कालावधीसाठी नूतन कार्यकारिणीची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. आज सिंधुदुर्गनगरी येथील आद्यपत्रकर बाळशास्त्री जांभेकर स्मारक व पत्रकार भवन येथे झालेल्या सर्वसाधारण सभेत हि निवड करण्यात आली. यामध्ये अध्यक्ष,सचिव उपाध्यक्ष , खजिनदार, सहसचिव व कार्यकारणी सदस्य अशा जिल्हा कार्यकारिणीची बिनविरोध निवड जिल्हा पत्रकार संघाच्या उपस्थित सभासदांनी केली. परिषद प्रतिनिधी म्हणून गणेश जेठे यांचीही बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा संघाची सर्वसाधारण सभा अध्यक्ष उमेश तोरसकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या सभेत अहवाल वाचन, अंदाजपत्रक मंजुरीसह नूतन कार्यकारिणी निवडण्यात आली. सर्वानुमते अध्यक्षपदी उमेश तोरसकर यांची पुन्हा एकदा निवड करण्यात आली. उर्वरित कार्यकारिणी पुढील प्रमाणे सचिव बाळ खडपकर, उपाध्यक्ष आनंद लोके, विद्याधर उर्फ बंटी केनवडेकर, संतोष राऊळ, किशोर जेतापकर, खजिनदार - संतोष सावंत, महेश सरनाईक (एक एक वर्ष विभागून), सहसचिव प्रवीण मांजरेकर, कार्यकारणी सदस्य - राजन नाईक कुडाळ, लवू महाडेश्वर सिंधुनगरी, लक्ष्मीकांत भावे कणकवली, अमित खोत मालवण, प्रशांत वाडेकर देवगड, महेंद्र मातोंडकर वेंगुर्ला, सुहास देसाई दोडामार्ग आणि निमंत्रित सदस्य देवयानी वरसकर अशी नूतन कार्यकारिणी निवडण्यात आली आहे.

यावेळी ज्येष्ठ पत्रकार अशोक करंबेळकर, माधव कदम, गजानन नाईक, वसंतराव केसरकर, राजू तावडे, मंगल कामत, संतोष वायंगणकर, प्रमोद ठाकूर, रवी गावडे, सर्व कार्यकारिणी सदस्य, तालुका अध्यक्ष, सचिव आणि पदाधिकारी तसेच पत्रकार सदस्य उपस्थित होते. सभेच्या सुरुवातीला दिवंगत सदस्य आणि त्यांचे नातेवाईक याना श्रद्धांजली वाहण्यात आली तसेच उल्लेखनीय कामगिरी करणारे पत्रकार आणि पाल्य यांच्या अभिनंदनाचा ठराव करण्यात आला.

---------------

हिंदुस्थान समाचार / निलेश जोशी


 rajesh pande