“पक्षाने माझ्यावर उपकार केलेत” - रविंद्र चव्हाण
- भाजप प्रदेशाध्यक्ष झाल्यावर व्यक्त केले मनोगतमुंबई, 01 जुलै (हिं.स.) : अतिशय सामान्य कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या माझ्यासारख्या कार्यकर्त्याला प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवून भाजपने माझ्यावर मोठे उपकार केल्याचे मनोगत नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष र
रवींद्र चव्हाण


- भाजप प्रदेशाध्यक्ष झाल्यावर व्यक्त केले मनोगतमुंबई, 01 जुलै (हिं.स.) : अतिशय सामान्य कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या माझ्यासारख्या कार्यकर्त्याला प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवून भाजपने माझ्यावर मोठे उपकार केल्याचे मनोगत नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केले. मुंबईच्या वरळी येथे झालेल्या कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष म्हणून चव्हाण यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू, चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासह भाजपचे अनेक लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी उपस्थित होते.

मुंबईतील वरळी डोममध्ये आयोजित या कार्यक्रमाला आत्तापर्यंतची रेकॉर्ड ब्रेक गर्दी झाली होती. सर्व आसन व्यवस्था फुल्ल झाल्याने भाजप कार्यकर्त्यांना उभे राहून कार्यक्रम पाहावा लागला. महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष पदाच्या निवड प्रक्रियेत फक्त रविंद्र चव्हाण यांनी अर्ज दाखल केला होता. दुसरे कोणीही अर्ज दाखल न केल्यामुळे रविंद्र चव्हाण यांची भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. पक्षातर्फे झालेल्या या घोषणेनंतर आपले मनोगत व्यक्त करताना चव्हाण म्हणाले की, ‘भाजप ही माझी ओळख आहे. वर्ष 2002 मध्ये मी पक्षाच्या कामाला प्रारंभ केला. सामान्य कुटुंबातील माझ्यासारखा कार्यकर्ता प्रदेशाध्यक्ष होतो, हे अन्य कोणत्याच पक्षात होत नाही. या पक्षासाठी सर्वातोपरी कार्य करण्याचे धारिष्ट्य माझ्यात आहे. भाजपची विचारधारा गंगेसारखी निर्मळ आणि प्रभावी आहे. या विचारधारेला महाराष्ट्रातील कानाकोपर्‍यात पोचवण्याचे दायित्व आपले सर्वांचे कर्तव्य आहे. भाजपची विचारधारा सामान्य जनतेपर्यंत पोचवत नाही, तोपर्यंत त्यांना ‘फेक नेरेटिव्ह’मधून बाहेर काढता येणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी अहोरात्र देशाच्या नागरिकांना न्याय देण्यासाठी काम करत आहेत. देशातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोचण्याचे काम कार्यकर्ता करू शकतो. भाजपमध्ये प्रामाणिक कार्यकर्ते आहेत. आपणाला राष्ट्रीयत्त्वाचा विचार सामान्य जनतेपर्यंत नेण्यासाठी वाहक व्हायचे आहे. वर्ष २०२९ चे लक्ष ठेवून कठोर कष्ट कार्यकर्त्यांना घ्यायचे आहेत. येणार्‍या काळात सर्वजण मिळून सक्षक्त भाजप निर्माण करण्यासाठी पावले उचलूया असे आवाहन त्यांनी केले.

रविंद्र चव्हाण यांच्या रूपाने पहिल्यांदाच ठाणे जिल्ह्याला राज्याचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली. रविंद्र चव्हाण यांनी 2002 मध्ये भारतीय जनता युवा मोर्चा कल्याण जिल्हा उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी स्वीकारली आणि त्यांच्या सक्रिय राजकीय प्रवासाला सुरुवात झाली. कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या 2005 मध्ये झालेल्या निवडणुकीत चव्हाण सेनेसह भाजपच्या प्रस्थापितांना मागे टाकून डोंबिवलीच्या सावरकर रोड प्रभागातून नगरसेवक म्हणून पहिल्यांदा निवडून आले. त्यानंतर 2007 मध्ये स्थायी समितीचे अध्यक्षपद भूषविले. त्यांच्या विरोधात झालेल्या स्वकीयांच्या बंडासह विरोधकांना न जुमानता चव्हाण हे 2009, 2014, 2019 आणि 2024 मध्ये सलग 4 वेळा आमदार बनले आहेत

----------------------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande