नगर जिल्हा रोलर स्केटिंग स्पर्धेत राम शेळमकरने पटकावले सुवर्णपदक
अहमदनगर, 3 नोव्हेंबर (हिं.स.)। अहमदनगर जिल्हा रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत टीम एम स्पोर्ट्स अकॅडमी स्केटिंग क्लबचा खेळाडू राम शेळमकर याने सुवर्ण पदक पटकाविले.नुकतीच ही स्पर्धा भिंगार येथे पार पडली.या स्पर्धेत नगर शहरासह जिल्ह्यातील खेळाडू सहभा
जिल्हा रोलर स्केटिंग स्पर्धेत राम शेळमकर ने पटकावले सुवर्णपदक


अहमदनगर, 3 नोव्हेंबर (हिं.स.)।

अहमदनगर जिल्हा रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत टीम एम स्पोर्ट्स अकॅडमी स्केटिंग क्लबचा खेळाडू राम शेळमकर याने सुवर्ण पदक पटकाविले.नुकतीच ही स्पर्धा भिंगार येथे पार पडली.या स्पर्धेत नगर शहरासह जिल्ह्यातील खेळाडू सहभागी झाले होते.

सात ते नऊ वर्ष वयोगटात राम शेळमकर याने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करुन सुवर्ण पदक मिळवले.तो आर्मी पब्लिक स्कूल (एमआयसी ॲण्ड एस) चा विद्यार्थी आहे.या स्पर्धेतून त्याची राज्य पातळीवर निवड झाली आहे.ही स्पर्धा लवकरच मुंबई येथे होणार आहे.तो प्रशिक्षक प्रमोद डोंगरे आणि शुभम कर्पे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे.या यशाबद्दल विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी राम शेळमकर याचे अभिनंदन केले आहे.

हिंदुस्थान समाचार / Shirish Kulkarni


 rajesh pande