रत्नागिरी : जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत योगेश कोंडविलकरला दुहेरी मुकुट
रत्नागिरी, 1 जानेवारी, (हिं. स.) : दापोलीतील जॉली स्पोर्ट्स व लायन्स क्लबच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या रत्नागिरी जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत पुरुष एकेरी व दुहेरीचे विजेतेपद मिळवत देवरूखच्या योगेश कोंडविलकर याने दुहेरी मुकुट पटकावला. स्पर्धेचे उद्
जिल्हा मानांकन कॅरम


रत्नागिरी, 1 जानेवारी, (हिं. स.) : दापोलीतील जॉली स्पोर्ट्स व लायन्स क्लबच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या रत्नागिरी जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत पुरुष एकेरी व दुहेरीचे विजेतेपद मिळवत देवरूखच्या योगेश कोंडविलकर याने दुहेरी मुकुट पटकावला.

स्पर्धेचे उद्घाटन दापोली अर्बन बँकेचे अध्यक्ष डॉ. जयवंत जालगावकर यांनी केले. या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा सौ. साधना बाळासाहेब बोत्रे, जॉली स्पोर्ट्सचे अध्यक्ष अरुण गांधी, लायन्स क्लबचे अध्यक्ष अतुल मेहता, रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप भाटकर, जॉली स्पोर्ट्सचे सेक्रेटरी श्रीराम माजलेकर, लायन्स क्लब सेक्रेटरी कौशिक मेहता, रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनचे सेक्रेटरी मिलिंद साप्ते, स्पर्धा कमिटी अध्यक्ष सागर मोरे, स्पर्धा प्रमुख माधव शेट्ये, शैलेश वाघाटे यांच्यासह खेळाडू, प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दापोली अर्बन बँकेचे अध्यक्ष डॉ. जयवंत जालगावकर यांनी दापोलीत पुढील वर्षी राज्यस्तरीय कॅरम स्पर्धा घेण्याची सूचना केली. स्पर्धेला आपण सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.स्पर्धेच्या बक्षीस समारंभाच्या वेळी बोलताना सौ. साधना बोत्रे यांनी मंडणगड येथील रहिवासी व महिला गटातील उपविजेती खेळाडू सौ. सुप्रिया मर्चंडे यांना प्रोसाहन देण्यासाठी नवीन कॅरम देण्याचे जाहीर केले. स्पर्धेत एकमेव ब्रेक टू फिनिशची नोंद देवरूखच्या स्वप्नील कदम याने केली.

स्पर्धेचा सविस्तर निकाल असा :

पुरुष एकेरी अंतिम फेरी – योगेश कोंडविलकर विजयी विरुद्ध राहुल भस्मे (१७ -०६, १४-०२). उपान्त्य फेरी १ – राहुल भस्मे विजेता विरूद्ध सुजित जाधव (२५-०४, २५-००). उपांत्य फेरी २ – योगेश कोंडविलकर विजयी विरुद्ध अभिजित खेडेकर (२५-१५, २५-११). पुरुष दुहेरी अंतिम फेरी – संजय कोंडविलकर/योगेश कोंडविलकर विजेता विरुद्ध दिनेश पारकर/नीलेश निवळकर (१७-०६, १४-०२). उपांत्य फेरी १ – दिनेश पारकर/नीलेश निवळकर विजेता विरुद्ध विशाल ओतारी/सुनील जाधव (२५- १२), ११-०८). उपांत्य फेरी २ – संजय कोंडविलकर/योगेश कोंडविलकर विजेता विरुद्ध राहुल भस्मे/स्वप्नील कदम (१२-१०), (१७-०१). कुमार गट अंतिम फेरी – ओम पारकर विजेता विरुद्ध हर्षल पाटील (२४-००), (०७-०८), (२०-००). किशोर गट अंतिम फेरी – स्मित कदम विजेता विरुद्ध सर्वेश आमरे (२५-०१), (१८-१७). महिला गट अंतिम फेरी – स्वरा मोहिरे विजेता विरुद्ध सुप्रिया मर्चंडे (०४-२४), (२५-१३), (२०-०७).

---------------

हिंदुस्थान समाचार / बाळकृष्ण कोनकर


 rajesh pande