राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघात 4140 उमेदवार निवडणूक रिंगणात
मुंबई, 4 नोव्हेंबर (हिं.स.) - राज्यातील विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी 288 मतदारसंघात 7 हजार 78 उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र वैध ठरले होते. त्यातील आज दि. 4 नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम मुदतीपर्यंत 2 हजार 938 उमेदवारांनी
विधान भवन


मुंबई, 4 नोव्हेंबर (हिं.स.) - राज्यातील विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी 288 मतदारसंघात 7 हजार 78 उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र वैध ठरले होते. त्यातील आज दि. 4 नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम मुदतीपर्यंत 2 हजार 938 उमेदवारांनी माघार घेतल्याने आता राज्यात 4 हजार 140 उमेदवार अंतिमत: निवडणूक रिंगणात आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.

राज्यातील सर्व 288 विधानसभा मतदार संघात एकाच टप्प्यात दि. 20 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान होणार असून दि. 23 नोव्हेंबर 2024 रोजी मतमोजणी होणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande