केजरीवालांनी शेतकऱ्यांचा विश्वासघात केला-शिवराज सिंह चौहान
नवी दिल्ली, 02 जानेवारी (हिं.स.) : आम आदमी पार्टीचे (आप) संयोजक अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारतर्फे शेतकऱ्यांसाठी आणलेल्या योजना राबवल्या नाहीत याकडे केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी अंगुलीनिर्देश केला आहे. यासंदर्भात त्यांनी दिल्लीच्
शिवराज सिंह चौहान


नवी दिल्ली, 02 जानेवारी (हिं.स.) : आम आदमी पार्टीचे (आप) संयोजक अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारतर्फे शेतकऱ्यांसाठी आणलेल्या योजना राबवल्या नाहीत याकडे केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी अंगुलीनिर्देश केला आहे. यासंदर्भात त्यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांना पत्र पाठवले आहे.

या पत्रात केंद्रीय कृषीमंत्री म्हणाले की, माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतील शेतकरी बंधू-भगिनींचा विश्वासघात केला आहे. केजरीवाल यांनी सरकारमध्ये येताच जनतेचे निर्णय घेण्याऐवजी आपले रडगाणे सुरू ठेवले. दिल्लीतील शेतकरी मला भेटलो असून त्यांना अनेक योजनांचा लाभ मिळत नाही. दिल्ली सरकारमध्ये शेतकऱ्यांबद्दल सहानुभूती नाही दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या हिताचे कधीही योग्य निर्णय घेतले नाहीत. केंद्र सरकारच्या शेतकरी हिताच्या योजनाही ‘आप’ सरकारने दिल्लीत राबविणे बंद केले आहे. दिल्लीचे शेतकरी आज चिंतेत आहेत, असे त्यांनी पत्रात लिहीले आहे. दिल्ली सरकार केंद्राच्या अनेक शेतकरी कल्याणकारी योजना राबवत नसल्यामुळे शेतकरी बंधू-भगिनी या योजनांच्या लाभापासून वंचित राहत आहेत. 'आप'ची धोरणे कृषी आणि शेतकरीविरोधी आहेत, असे चौहान यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे. दिल्लीत ट्रॅक्टर, हार्वेस्टर यासारख्या आवश्यक कृषी उपकरणांची व्यावसायिक वाहन श्रेणीत नोंदणी केली जात असल्याने शेतकऱ्यांना त्यांची कृषी उपकरणे चढ्या भावाने खरेदी करावी लागत असल्याचे चौहान म्हणाले. दिल्लीत सध्या शेतकऱ्यांकडून विजेसाठी व्यावसायिक दर आकारले जात आहेत. सिंचन आणि इतर शेतीच्या कामांसाठी स्वस्त वीज आवश्यक असते, मात्र दिल्लीत कृषी विजेसाठी शेतकऱ्यांकडून मोठी रक्कम घेतली जात असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

केंद्रीय कृषीमंत्र्यांच्या पत्राला प्रत्युत्तर देताना दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी मार्लेना म्हणाल्या की, भाजपने शेतकऱ्यांबद्दल बोलणे म्हणजे दाऊदने अहिंसेचा उपदेश दिल्यासारखे आहे.

------------------------------

हिंदुस्थान समाचार / CHANDRASHEKHAR SUKHDEV GOSAVI


 rajesh pande