राज्यातील १० सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या, दोघांना पदोन्नती 
मुंबई, २ जानेवारी (हिं.स.) : राज्यातील १० सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये पुणे, सातारा जिल्हाधिकाऱ्यांची बदली करण्यात आले आहेत. तसेच प्रशासकीय सेवेतील दोन वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली आहे. राज्य सरकारच्या सा
राज्यातील १० सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या, दोघांना पदोन्नती 


मुंबई, २ जानेवारी (हिं.स.) : राज्यातील १० सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये पुणे, सातारा जिल्हाधिकाऱ्यांची बदली करण्यात आले आहेत. तसेच प्रशासकीय सेवेतील दोन वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली आहे.

राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव व्ही. राधा यांच्या आदेशाचे पत्र जारी करण्यात आले आहेत. त्यानुसार, मिलिंद म्हैसकर यांना सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी कार्यभार देण्यात आला आहे. तर, वेणुगोपाल रेड्डी यांना उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि वन विभागाच्या अतिरिक्त सचिवपदी जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच, पुणे जिल्ह्याच्या जिल्हाधिकारीपदी साताऱ्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर, सातारा जिल्हाधिकारीपदी संतोष पाटील यांना जबाबदारी देण्यात आली आहे.

अधिकार्‍यांचे तपशील

1. मिलिंद म्हैसकर (IAS:RR:1992) अतिरिक्त मुख्य सचिव (1), सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई यांची अतिरिक्त मुख्य सचिव (वने), महसूल आणि वन विभाग, मंत्रालय, मुंबई

2. बी. वेणुगोपाल रेड्डी (IAS:RR:1994) अतिरिक्त मुख्य सचिव (वने), महसूल आणि वन विभाग, मंत्रालय, मुंबई यांची अतिरिक्त मुख्य सचिव, उच्च आणि तंत्रशिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई

3. विकास चंद्र रस्तोगी (IAS:RR:1995) प्रधान सचिव, उच्च आणि तंत्रशिक्षण विभाग., मंत्रालय, मुंबई यांना प्रधान सचिव (कृषी), कृषी आणि ADF विभाग, मंत्रालय, मुंबई

4. आय.ए.कुंदन (IAS:RR:1996) प्रधान सचिव, शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई यांची प्रधान सचिव (कामगार), उद्योग, ऊर्जा आणि कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई

5. विनिता वेद सिंगल (IAS:RR:1996) प्रधान सचिव (कामगार), उद्योग, ऊर्जा आणि कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई यांना प्रधान सचिव, पर्यावरण आणि हवामान बदल विभाग, मंत्रालय, मुंबई

6. डॉ. हर्षदीप कांबळे (IAS:RR:1997) यांना प्रधान सचिव, सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग, मंत्रालय, मुंबई

7. डॉ. निपुण विनायक (IAS:RR:2001) प्रकल्प संचालक, RUSA, उच्च तंत्रशिक्षण विभाग, मुंबई यांना सचिव (1), सार्वजनिक आरोग्य विभाग, मुंबई

8. जयश्री भोज (IAS:RR:2003) व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ, मुंबई यांची सचिव, अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई

9. डॉ. सुहास दिवसे (IAS:SCS:2009) जिल्हाधिकारी, पुणे यांची सेटलमेंट कमिशनर आणि संचालक, भूमी अभिलेख, पुणे

10. श्री.एच.एस.सोनवणे (IAS:SCS:2010) यांची नियुक्ती आयुक्त, क्रीडा आणि युवक, पुणे

11. श्री संतोष पाटील (IAS:SCS:2013) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे यांची जिल्हाधिकारी, सातारा

12. श्री जितेंद्र दुडी (IAS:RR:2016) जिल्हाधिकारी, सातारा यांची पुणे जिल्हाधिकारी

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande