अहमदनगर, 5 नोव्हेंबर (हिं.स.)।
महाराष्ट्र राज्य ज्युनियर आंतरजिल्हा फुटबॉल चॅम्पियनशिप (१५ वर्षा खालील) फुटबॉल स्पर्धेसाठी नगर जिल्ह्याचा फुटबॉल संघ शिरपूर (जि. धुळे) येथे रवाना झाला.अहमदनगर जिल्हा फुटबॉल असोसिएशनच्या वतीने खेळाडूंना शुभेच्छा देण्यात आल्या. नगर जिल्ह्याचा पहिला सामना छत्रपती संभाजीनगर यांच्याबरोबर होणार आहे.
जिल्ह्याची संघ निवड चाचणी नुकतीच भुईकोट किल्ला मैदान येथे पार पडली. यामध्ये विविध फुटबॉल क्लबच्या मुलांनी सहभाग नोंदवला होता.
जिल्ह्याच्या संघात कृष्णराज टेमकर (कर्णधार), यदुवर कोकरे, राजवर्धन वीर, स्वराज आडेप, जसवीरसिंग ग्रोव्हर, वेदांत मस्कर, प्रणव सैंदाणे, सौरभ खंडेलवाल, आर्यन लांडे, इंद्रजीत गायकवाड, अशोक चंद, माहीर गुंदेचा, प्रशिक जाधव, आदर्श बेरड, ईशांत अहुजा, भार्गव पिंपळे, आदर्श साबळे, भानुदास चंद या १८ खेळाडूंची निवड करण्यात आली आहे.निवड झालेल्या खेळाडूंना संघाची जर्सी देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी सचिव रौनप फर्नांडिस,उपाध्यक्ष जोगसिंग मिनहास,उपाध्यक्ष खालीद सय्यद,सहसचिव प्रदीपकुमार जाधव,अभिषेक सोनवणे,जॉय जोसेफ,राजेश अँथनी, राणाशेठ परमान, भाऊ भिंगारदिवे, निवड समिती सदस्य विक्टर जोसेफ, राजेंद्र पाटोळे, प्रशिक्षक जेव्हिअर स्वामी, संघ व्यवस्थापक वैभव मनोदिया उपस्थित होते.सर्व खेळाडूं चे जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया व वरिष्ठ उपाध्यक्ष मनोज वाळवेकर यांनी अभिनंदन करुन पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
हिंदुस्थान समाचार / Shirish Kulkarni