रत्नागिरी : अवैध मद्यविक्रीविरोधात ६६ गुन्हे दाखल
रत्नागिरी, 6 नोव्हेंबर, (हिं. स.) : राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या कारवाईत जिल्ह्यात अवैध मद्यविक्री आणि साठवणुकीविरोधात ६६ गुन्हे केले असून ५१ जणांना अटक केली आहे. या कारवाईत १ कोटी १९ लाख १४ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
रत्नागिरी : अवैध मद्यविक्रीविरोधात ६६ गुन्हे दाखल


रत्नागिरी, 6 नोव्हेंबर, (हिं. स.) : राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या कारवाईत जिल्ह्यात अवैध मद्यविक्री आणि साठवणुकीविरोधात ६६ गुन्हे केले असून ५१ जणांना अटक केली आहे. या कारवाईत १ कोटी १९ लाख १४ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून आतापर्यंत ही कारवाई करण्यात आली. या गुन्ह्यांमध्ये हातभट्टीची गावठी दारू १ हजार ४०० लिटर, देशी मद्य ४५.९ बल्क लिटर, विदेशी मद्य ५६.७ बल्क लिटर, गोवा राज्यात विक्रीकरिता असलेले विदेशी मद्य ९ हजार २७४.६३ बल्क लिटर, रसायन २७ हजार २०५ लिटर तसेच मद्याची अवैधरीत्या वाहतूक करणारा आयशर टेम्पो व मारुती स्विफ्ट कार या वाहनांसह एकूण १ कोटी १९ लाख १४ हजार ३०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक कीर्ती शेडगे यांनी दिली. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यापासून मुंबई-गोवा, कोल्हापूर-रत्नागिरी, चिपळूण-कराड या महामार्गांवरून प्रवासी तसेच माल वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी उत्पादन शुल्क विभागाकडून करण्यात येत आहे. गोवा राज्यातून रेल्वेद्वारे अवैध मद्याची वाहतूक होऊ नये याकरिता कोकण रेल्वे प्रशासनाशी समन्वय साधून रेल्वे पोलिसांसमवेत अचानक प्रवाशांच्या सामानाची तपासणी करण्यात येत आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून अवैध मद्याविरुद्धची कारवाई यापुढेही सुरूच राहणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / बाळकृष्ण कोनकर


 rajesh pande