रत्नागिरी : चिपळूण तालुक्यात २४ नोव्हेंबरला कबड्डी निवड चाचणी
रत्नागिरी, 6 नोव्हेंबर, (हिं. स.) : चिपळूण तालुका कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने चिपळूण तालुका कुमार-कुमारी गटातील निवड चाचणी कबड्डी स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा रविवारी, २४ नोव्हेंबरला कोलेखाजन येथील संतोष शिर्के यांच्या ओम स्पोर्टस् अकॅडमी ये
रत्नागिरी : चिपळूण तालुक्यात २४ नोव्हेंबरला कबड्डी निवड चाचणी


रत्नागिरी, 6 नोव्हेंबर, (हिं. स.) : चिपळूण तालुका कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने चिपळूण तालुका कुमार-कुमारी गटातील निवड चाचणी कबड्डी स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा रविवारी, २४ नोव्हेंबरला कोलेखाजन येथील संतोष शिर्के यांच्या ओम स्पोर्टस् अकॅडमी येथे होणार आहे.

स्पर्धेत असोसिएशनशी संलग्न असलेल्या कबड्डी संघांना सहभागी होता येईल. यात वैयक्तिक खेळाडूंना सहभागी होता येणार नाही. सहभागी होणाऱ्या संघांनी २४ नोव्हेंबरला सकाळी ८.३० वा. खेळाडू व फाइलसह तांत्रिक समितीकडे वजन करण्यासाठी उपस्थित राहावे. स्पर्धेत तालुक्यातील सर्व कबड्डी संघांनी संघांनी सहभागी व्हावे, असे आवाहन अध्यक्ष बाबू तांबे, कार्यवाह विलास गुजर आदींनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / बाळकृष्ण कोनकर


 rajesh pande