महालक्ष्मी योजनेंतर्गत दर महिन्याला तीन हजार रुपये देणार - राहुल गांधी 
मुंबई, ६ नोव्हेंबर (हिं.स.) : आम्ही महालक्ष्मी योजना आणणार आहोत. यात दर महिन्याला तीन हजार रुपये देणार आहोत. इंडी आघाडीचं सरकार अकाऊंटमध्ये हे पैसे देणार आहे. महाराष्ट्रातील महिलांना ती हजार रुपये खटाखटा खटाखट देणार, यासह महिलांना बसचा प्रवास मोफत कर
राहुल गांधी


मुंबई, ६ नोव्हेंबर (हिं.स.) : आम्ही महालक्ष्मी योजना आणणार आहोत. यात दर महिन्याला तीन हजार रुपये देणार आहोत. इंडी आघाडीचं सरकार अकाऊंटमध्ये हे पैसे देणार आहे. महाराष्ट्रातील महिलांना ती हजार रुपये खटाखटा खटाखट देणार, यासह महिलांना बसचा प्रवास मोफत करणार, राज्यात जातीय जनगणना, अशा घोषणा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली‌.

मुंबईत महाविकास आघाडीतर्फे आयोजित महाराष्ट्र स्वाभिमान सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यत ते बोलत होते. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह मविआचे नेते उपस्थित होते.

राहुल गांधी म्हणाले, महाराष्ट्रातील महिला बसमधून कुठे जाईल तेव्हा त्यांना बस तिकीट खरेदी करण्यासाठी पैसे देण्याची गरज नाही. फ्रिमध्ये जाईल. कारण ज्या भाजप सरकारने महागाई दिली, गॅस सिलिंडरची वाढवलंय. त्याचं सर्वाधिक वेदना महाराष्ट्रातील महिलांना होत आहे. देशात जाती जनगणना केली पाहिजे. सत्तेत आपला किती सहभाग आहे, संस्था कुणाच्या ताब्यात आहेत आणि संपत्ती कुणाच्या हाती आहेत, हे लोकांना कळलं पाहिजे. त्यासाठी आम्ही जाती जनगणनेची मागणी केली आहे. कर्नाटक आणि तेलंगणात आमचं सरकार आहे. आम्ही तिथे जाती जनगणना करण्यास सुरुवात केली आहे. पूर्वी सर्व्हे घरात बसून व्हायचे. सवाल अधिकारी तयार करायचे. पण पहिल्यांदाच सर्वेचे प्रश्न आम्ही जनतेकडून मागवले. लोकांशी मिटिंग केली. सवाल आले आणि तेच प्रश्न तेलंगनात विचारले जाणार आहे. असं करणारं तेलंगना हे पहिलं राज्य आहे. महाराष्ट्रात आमचं सरकार येताच जाती जनगणनेचं काम सुरू करणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande