शिवाजी महाराजांचं मंदिर प्रत्येक जिल्ह्यासह सुरतेलाही बांधणार - उद्धव ठाकरे 
मुंबई, ६ नोव्हेंबर (हिं.स.) : आता निवडणुकांचे फटाके वाजायला लागले आहेत. आपल्याकडे आयटम बॉम्ब आणि पलिकडे फुसके लवंगी आहेत. 23 तारखेला फटाके वाजवण्याचा निश्चय करायला आज आपण आलो आहोत. तसेच मी प्रत्येक जिल्ह्यात शिवाजी महाराज यांचं मंदिर बांधणार आणि सुरत
उद्धव ठाकरे


मुंबई, ६ नोव्हेंबर (हिं.स.) : आता निवडणुकांचे फटाके वाजायला लागले आहेत. आपल्याकडे आयटम बॉम्ब आणि पलिकडे फुसके लवंगी आहेत. 23 तारखेला फटाके वाजवण्याचा निश्चय करायला आज आपण आलो आहोत. तसेच मी प्रत्येक जिल्ह्यात शिवाजी महाराज यांचं मंदिर बांधणार आणि सुरतेलाही बांधणार असल्याचा निर्धार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले.

मुंबईत महाविकास आघाडीतर्फे आयोजित महाराष्ट्र स्वाभिमान सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यत ते बोलत होते. यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह मविआचे नेते उपस्थित होते.

ठाकरे पुढे म्हणाले, शिवाजी महाराज म्हटलं की यांच्या अंगाची लाही लाही होते. ⁠देवा भाऊ आणि जाऊ तिकडे खाऊ. मुंब्र्यात त्यांनी मंदीर बांधायला चॅलेंज केलं. मात्र ते विसरले की मुंब्र्याच्या वेशीवर शिवाजी महाराज, तुकाराम यांची वेस आहे. ज्या गद्दाराला तुम्ही फोडला आणि मुख्यमंत्री म्हणून डोक्यावर बसवला. त्यांच्या ठाण्यात तुम्हाला मंदिर बांधता येत नाही, असं वाटत असेल तर कशाला डोक्यावर बसवला? असा सवाल उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना केला.

पुढे बोलतान उद्धव ठाकरे म्हणाले, कोळीवाड्याचा विकास आम्ही करणार आहोत. हे इमारत बांधून देतील मग त्यांच्या होड्या काय पार्किंगमध्ये लावणार का आणि गच्चीत मासे सुकवणार का? फराळ करायला जमत नाही असं काही जण म्हटले कारण महागाई वाढली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande