आदिवासी विकास विभागाच्या पदांकरिता अर्ज करण्याची मुदतवाढ १२ नोव्हेंबरपर्यंत
मुंबई, 7 नोव्हेंबर (हिं.स.)। आदिवासी विकास विभागातील विविध पदांकरिता ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत आता १२ नोव्हेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे, अशी माहिती विभागाच्या आयुक्त नयना मुंडे यांनी दिली आहे. आदिवासी विकास विभागाने ५ ऑक्टोबर २०२४ ला विविध पदांकरित
आदिवासी विकास विभागाच्या पदांकरिता अर्ज करण्याची मुदतवाढ १२ नोव्हेंबरपर्यंत


मुंबई, 7 नोव्हेंबर (हिं.स.)। आदिवासी विकास विभागातील विविध पदांकरिता ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत आता १२ नोव्हेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे, अशी माहिती विभागाच्या आयुक्त नयना मुंडे यांनी दिली आहे.

आदिवासी विकास विभागाने ५ ऑक्टोबर २०२४ ला विविध पदांकरिता जाहिरात प्रसिद्ध केली होती. यामध्ये अर्ज करण्याची अंतिम मुदत २ नोव्हेंबर ठेवली होती. त्यास आता १२ नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

तसेच २३ नोव्हेंबर २०२३ रोजी भरती प्रक्रियेची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानुसार अर्जाचे शुल्क विभागाने परत करण्यासाठी २८ ऑक्टोबर पर्यंत मुदत दिली होती. त्याला १२ नोव्हेंबर २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी आदिवासी विकास आयुक्तालय नाशिक, आदिवासी विकास भवन, पहिला मजला, जुना आग्रा रोड नाशिक येथे अथवा टोल फ्री 1800 267 0007 या क्रमांकावर संपर्क साधावा.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande