जम्मू-काश्मीरविधानसभेत हाणामारी 
कलम 370 संदर्भातील ठरावावरून उद्भवला वाद श्रीनगर, 07 नोव्हेंबर (हिं.स.) : जम्मू-काश्मीर विधानसभेत आज, गुरुवारी 370 कलमाच्या पुनरूज्जीवनासंदर्भातील ठरावावरून सत्ताधारी आणि विरोधी आमदारांमध्ये हाणामारी झाली.त्यामुळे
जम्मू-काश्मीर विधानसभेत हाणामारी


कलम

370 संदर्भातील ठरावावरून उद्भवला वाद

श्रीनगर,

07 नोव्हेंबर (हिं.स.) : जम्मू-काश्मीर विधानसभेत आज,

गुरुवारी 370 कलमाच्या पुनरूज्जीवनासंदर्भातील ठरावावरून सत्ताधारी आणि विरोधी

आमदारांमध्ये हाणामारी झाली.त्यामुळे

सभागृहात एकच गोंधळ आणि तणाव निर्माण झाल्यामुळे विधानसभेचे कामकाज तहकूब करावे

लागले.

विधानसभेचे

कामकाज सुरु होताच बारामुल्‍लाचे खासदार इंजिनियर रशीद यांचे बंधू, आमदार खुर्शीद अहमद शेख यांनी कलम 370 वर बॅनर सभागृहात दाखवले. त्यावर विरोधी पक्षनेते

सुनील शर्मा यांनी तीव्र आक्षेप घेतला. सत्ताधारी-विरोधी आमदारांमध्‍ये हाणामारी

झाली. सभागृहात काही काळ प्रचंड तणाव निर्माण झाला.सभागृहाचे कामकाज काही काळासाठी

तहकूब करण्यात आले.

सोमवारी

4 नोव्‍हेंबर रोजी देखील विधानसभा अधिवेशनाच्‍या पहिल्‍याच दिवशी राज्‍याला विशेष

दर्जा बहाल करणारे कलम 370 पुनर्संचयित करण्‍याचा प्रस्‍ताव 'पीडीपी'च्‍या आमदार वाहिद पारा यांनी

मांडला होता. या प्रस्‍तावाला भाजपच्‍या आमदारांनी तीव्र निषेध केला होता. यानंतर

विधानसभेत प्रचंड गदारोळ झाला होता. जम्मू-काश्मीर विधानसभेत पीडीपीचे आमदार वाहिद

पारा यांनी कलम 370 मागे घेण्याचा प्रस्ताव

मांडला. जम्मू-काश्मीरला पुन्हा एकदा विशेष राज्याचा दर्जा द्यावा, अशी मागणी त्‍यांनी केली. विधानसभेत या

प्रस्तावावरून भाजप आणि पीडीपी आमदारांमध्ये जोरदार वादावादी झाली होती.त्यानंतर गुरुवारी खुर्शीद अहमद शेख यांनी कलम 370 वर बॅनर सभागृहात दाखवले. त्यावर विरोधी पक्षनेते

सुनील शर्मा यांनी तीव्र आक्षेप घेतला. सत्ताधारी-विरोधी आमदारांमध्‍ये हाणामारी

झाली. सभागृहात काही काळ प्रचंड तणाव निर्माण झाला. सभागृहात गोंधळ घालणाऱ्या काही

विरोधी आमदारांना मार्शल्सनी ताब्यात घेतले. दरम्यान विरोधकांनी विधानसभा अध्यक्षांवर

भेदभाव केल्याचा आरोप केलाय.

------------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande