बंगळुरू,
07 नोव्हेंबर (हिं.स.) : वक्फ दुरुस्ती विधेयकासंदर्भात
स्थापन करण्यात आलेल्या जेपीसीच्या अध्यक्षा जगदंबिका पाल यांनी आज,गुरुवारी कर्नाटकातील शेतकऱ्यांची भेट घेतली. कर्नाटकातील वक्फ बोर्डाने विजापूर (विजयपूर) आणि बिदर येथील शेतकऱ्यांच्या जमिनीवर दावा केला होता. त्यामुळे
कर्नाटकात राजकीय वाद आणखी वाढला आहे. शेतकऱ्यांची भेट घेतल्यानंतर जगदंबिका पाल
म्हणाले की, 'शेतकऱ्यांनी मला एक निवेदन दिले ज्यामध्ये वक्फ
बोर्डाने त्यांच्या मालकीच्या जमिनीवर दावा केला आहे. मी त्यांना या जमिनीच्या
मालकीचा पुरावा आहे का, असे विचारले असता,
गेल्या 60 ते 70 वर्षांपासून या जमिनीवर शेती करत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.राज्यातील काँग्रेस सरकारला जगदंबिका पाल यांची
शेतकऱ्यांची भेट आवडलेली नाही. काँग्रेस खासदार मोहम्मद जावेद म्हणाले की,
'जेपीसीच्या संपूर्ण टीमने कर्नाटक सोडले
पाहिजे. त्याला शेतकऱ्यांना भेटण्याचा अधिकार कोणी दिला? राजकीय निर्णय एकतर्फी घेणे योग्य नाही. हे प्रकरण मिटले असून
शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्याकडेच राहतील, असे कर्नाटकच्या काँग्रेस सरकारने आधीच सांगितले
असताना त्याला राजकीय मुद्दा बनवण्याची गरज नाही. त्यांचे हे पाऊल देशाच्या संसदीय लोकशाहीच्या हिताचे नाही
असे जावेद यांनी सांगितले.
-----------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी