कल्याण - सचिन बासरे यांच्या पदयात्रेला महिलांचा उस्फूर्त प्रतिसाद
कल्याण, 7 नोव्हेंबर (हिं.स.)। कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या अधिकृत उमेदवार म्हणून सचिन बासरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. उमेदवारीच्या घोषणेनंतर सचिन बासरे यांनी मतदारसंघात *‘आम्ही सारे
कल्याण - सचिन बासरे यांच्या पदयात्रेला महिलांचा उस्फूर्त प्रतिसाद


कल्याण, 7 नोव्हेंबर (हिं.स.)। कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या अधिकृत उमेदवार म्हणून सचिन बासरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. उमेदवारीच्या घोषणेनंतर सचिन बासरे यांनी मतदारसंघात *‘आम्ही सारे बासरे’* ही मोहिम जोमाने राबवली आहे. या मोहिमेला बुधवारी बल्यानी चौक ते मोहोली दरम्यान आयोजित पदयात्रेत चांगला प्रतिसाद मिळाला. या पदयात्रेत मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या. पदयात्रेत सहभागी झालेल्या महिलांनी उत्स्फूर्तपणे आपला पाठिंबा जाहीर केला. विशेषतः महिला बचत गटांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. यावेळी महिलांनी स्वतःच्या समस्या मांडल्या. वाढती महागाई, रोजगाराची कमतरता, महिला उद्योजकांसाठी आवश्यक असलेल्या सुविधा अशा विविध मुद्द्यांवर त्यांनी चर्चा केली.

याबाबत उपाय म्हणून सचिन बासरे म्हणाले, “महिला बचत गटांच्या माध्यमातून आम्ही कल्याण पश्चिममध्ये आर्थिक स्वावलंबनाचा नवा अध्याय लिहू. रोजगाराच्या संधी निर्माण करणे, लघुउद्योगांना चालना देणे, आणि महिलांसाठी विशेष योजना राबवणे हे माझ्या प्राधान्यक्रमावर आहे. महिलांचे जीवनमान उंचावण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. महिला सक्षमीकरणासाठी व्यापक योजना आखण्यात येणार असल्याचेही बासरे यांनी जाहीर केले. “महिला उद्योगांचे व्यापक जाळे उभे करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. महिलांनी पुढे येऊन आपल्या कुटुंबाच्या आर्थिक उन्नतीत योगदान द्यावे,” असे आवाहन बासरे यांनी केले.पदयात्रेदरम्यान महिलांचा प्रतिसाद पाहून बासरे भारावून गेले होते. “आपण ज्या विश्वासाने मला पाठिंबा दिला, त्याचे ऋण फेडण्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन,” असे भावनिक उद्गार त्यांनी काढले. कल्याण पश्चिममधील आगामी विधानसभा निवडणुकीत महिलांची भूमिका निर्णायक ठरणार असल्याचे या पदयात्रेवरून स्पष्ट झाले आहे. महिलांच्या प्रश्नांना प्राधान्य देणारा उमेदवार निवडण्याकडे त्यांचा कल आहे, आणि बासरे यांनी त्यावर बोट ठेवत योग्य दिशा आखली आहे. “कल्याण पश्चिममधील महिलांनी आजच्या पदयात्रेत जो प्रचंड उत्साह दाखवला, तो येणाऱ्या निवडणुकीत बदलाचे संकेत देतो. सचिन बासरे यांच्या नेतृत्वाखाली कल्याण पश्चिममध्ये महिला सक्षमीकरणाचे स्वप्न साकार होईल, अशी महिलांची अपेक्षा आहे.” “महागाई व रोजगार यांसारख्या मुद्द्यांवर महिलांचा आवाज बुलंद झाला आहे. त्यांच्या विश्वासास पात्र ठरण्यासाठी मी स्वतःला झोकून देईन,” असे सचिन बासरे यांनी पदयात्रेनंतर स्पष्ट केले. या पदयात्रेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडीच्या उपशहर संघटक अस्मिता गोवळकर, विभाग संघटक रोहिणी काटकर, उपविभाग प्रमुख संध्या ठोसर, शाखा संघटक शरयू सावंत आणि सुवर्णा आव्हाड उपस्थित होत्या.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande