ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात दररोज रक्तदान शिबिराचे आयोजन
ठाणे, 7 नोव्हेंबर (हिं.स.)। ठाणे, मुंबई शहरामध्ये गरजू रुग्णांना रक्ताचा तुटवडा भासत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यानुषंगाने गुरुवार, दि.6 नोव्हेंबर 2024 पासून रक्तपेढी विभाग (ब्लड बँक), सिव्हिल रूग्णालय ठाणे, प्रादेशिक मनोरुग्णालयाजवळ, ठाणे येथे र
ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात दररोज रक्तदान शिबिराचे आयोजन


ठाणे, 7 नोव्हेंबर (हिं.स.)। ठाणे, मुंबई शहरामध्ये गरजू रुग्णांना रक्ताचा तुटवडा भासत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यानुषंगाने गुरुवार, दि.6 नोव्हेंबर 2024 पासून रक्तपेढी विभाग (ब्लड बँक), सिव्हिल रूग्णालय ठाणे, प्रादेशिक मनोरुग्णालयाजवळ, ठाणे येथे रक्तदान शिबिराचे दररोज आयोजन करण्यात येणार आहे.

तरी इच्छुक रक्तदात्यांनी, स्वयंसेवी संस्थांनी, महाविद्यालयीन तरूण-तरूणींनी स्वेच्छेने रक्तदान करण्यास पुढाकार घ्यावा आणि गरजू रुग्णांना मदत करावी व रक्तदान करून या सामाजिक व राष्ट्रीय कार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.कैलास पवार यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande