ठाणे, 7 नोव्हेंबर (हिं.स.) ठाणे शहर विधानसभेचे भाजपचे आमदार संजय केळकर यांनी मॉर्निंग वॉकच्या प्रचारावर अधिक भर दिल्याचे दिसून येत आहे. त्यांनी मॉर्निंग वॉक प्रचार रॅलीवर भर दिला. सकाळीच त्यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांसह पाचापाखाडी येथील सर्व्हीस रोडवर मॉर्निंग वॉक करणाऱ्यांची भेट घेतली. यावेळी त्यांना मॉर्निंग वॉक वाल्यांनी थांबून प्रतिसाद दिल्याचे दिसून आले.
केळकर यांनी कचराळी तलाव येथील मॉर्निंग वॉक करणाऱ्यांची भेट घेतली होती. नंतर त्यांनी पाचपाखाडी भागातील सर्व्हीस रोडवर मॉर्निंग वॉकसासाठी येणाऱ्या अबाल, वुध्दांच्या भेटीगाठी घेतल्या. यावेळी त्यांच्या समवेत भाजपचे ठाणे शहर अध्यक्ष संजय वाघुले, सुभाष काळे, प्रशांत गावंड, संतोष साळुंखे, राजेश ठाकरे, पांढरीनाथ पवार, सचिन केदारी, सुदेश कामत, महेश विनेरकर आदींसह इतर कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी मॉर्निंग वॉक करणाऱ्यांनी त्यांना चांगला प्रतिसाद दिला. केळकर यांनी या मॉर्निंग वॉक करण्यांबरोबर घालविल्याचे दिसून आले. त्यातही येथे फिरण्यासाठी येणा-यांनी देखील केळकर यांचे अगदी मनापासून स्वागत केले. आपला निर्धार पक्का यावेळेसही केळकर यांच्याच नावावर शिक्का असेच घोषवाक्य त्यांनी जाहीर करीत केळकर यांना विजयाच्या शुभेच्छा दिल्या.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर