डोंबिवली, 13 डिसेंबर (हिं.स.) फ्लिप कार्डच्या हबमधुन लाखो रूपये किमतीचे विविध कपंनीचे मोबाईल फोन, लॅपटॉप व इतर वस्तु चोरी करून त्या विक्रीकरीता निघालेल्या चौघांना कल्याण गुन्हे अन्वेशन विभागाने अटक करून जेरबंद केले.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रणव रविंद्र पांचाळ वय २५ वर्षे रा. माउली कृपा बिल्डींग रूम नं. ५, ललित काटयाजवळ, मानपाडा डोंबिवली पुर्व जि. ठाणे, प्रशात गंगाराम शेलार वय २५ वर्षे रा. स्वत:चे घर, म्हारळेश्वार मंदिरजवळ, म्हारळ रोड, म्हारळ गाव उल्हासनगर जि. ठाणे, अमित भिमराव राणे वय ३० वर्षे रा. गावदेवी धाम सोसायटी, रूम नं ५०१, गावदेवी मंदिर जवळ, तिसगाव, कल्याण पुर्व जि. ठाणे, अजित भिमराव राणे वय २८ वर्षे रा. गावदेवी धाम सोसायटी, रूम नं ५०१, गावदेवी मंदिर जवळ, तिसगाव, कल्याण पुर्व जि. ठाणे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
कल्याण गुन्हे अन्वेशन विभागाला खबर मिळालली होती की हे चौघे मोबाईल फोन, लॅपटॉप तसेच इतर वस्तु विक्री करणेकरिता डोंबिवलीत येत आहेत. पोलिसांनी डोंबिवली पूर्वेकडील खंबाळपाडा रोड येथे सापळा रचून चौघांना पकडले.अटक केलेल्या चोरट्याकडे चार बॉक्स मध्ये सापलेले मोबाईल फोन, लॅपटॉप तसेच इतर वस्तु हस्तगत केल्या. हे चौघे मागील तीन महिन्यात चक्की नाका, कोळशेवाडी परिसरातील अमेय हॉस्पीटल समोरील फ्लिप कार्डच्या हबमधुन चोरी करत होते असे चोरट्यानी पोलिसांना सांगितले. चोरीचे मोबाईल फोन, लॅपटॉप तसेच इतर वस्तु विक्री करणेकरिता या विक्री करणेकरीता ते घेवुन जात असल्याचे सांगितले. यांचेकडुन एकूण ६,३३,६७९/- रूपये किमंतीचे विविध कंपनीचे २३ मोबाईल फोन, २ लॅपटॉप, १ कॅनॉन कपंनीचा कॅमेरा ईलेक्ट्रीक फॅन तसेच विविध कंपनीचे एअर बट्स इतर वस्तु अशा एकुण ५० वस्तु असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
सदर कामगिरी अपर पोलीस आयुक्त (गुन्हे )पंजाबराव उगले, पोलीस उपायुक्त ( गुन्हे )अमरसिंह जाधव, सहायक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित शिंदे, सपोनि संतोष उगलमुगले, पोउपनि विनोद पाटील, पोलीस अमंलदार विलास कडु, दिपक महाजन, गुरूनाथ जरग, मिथुन राठोड, विनोद चन्ने, सतिश सोनावणे, यांनी बजावली.
हिंदुस्थान समाचार / Prashant Joshi