नाशिक, 26 डिसेंबर (हिं.स.)।घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून अज्ञात चोरट्याने घरातील कपाटात असलेले २० तोळे वजनाचे सोन्याचांदीचे दागिने व रोकड असा सुमारे चार लाख रुपयांचा ऐवज घरफोडी करून चोरून नेल्याची घटना जेलरोड येथे घडली.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी सुनील मुरलीधर भालेराव (रा. पारिजातनगर, जेलरोड, नाशिकरोड) यांच्या राहत्या घराच्या मुख्य दरवाजाचा कडीकोयंडा अज्ञात चोरट्याने कशाच्या तरी सहाय्याने तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर घरातील बेडरूममधील लोखंडी कपाटात असलेल्या १ लाख २० हजार रुपये किमतीच्या सहा तोळे वजनाच्या सोन्याच्या बांगड्या, ३० हजार रुपये किमतीचे दीड तोळा वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, २० हजार रुपये किमतीची एक तोळा वजनाची सोन्याची मोहनमाळ, २० हजार रुपये किमतीचा एक तोळा वजनाचा सोन्याचा नेकलेस, ३० हजार रुपये किमतीचा दीड तोळा वजनाचा सोन्याचा नेकलेस, ३० हजार रुपये किमतीचे दीड तोळा वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, २७ हजार रुपये किमतीची पावणेदोन तोळा वजनांची मोहनमाळ, २० हजार रुपये किमतीची एक तोळा वजनाची सोन्याची माळ, २० हजार रुपये किमतीची एक तोळा वंजनाची सोन्याची चेन, १० हजार रुपये किमतीची कानातील कर्णफुले, ७० हजार रुपये किमतीचे साडेतीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण, तीन हजार रुपये किमतीचे चांदीचे पैंजण, लहान मुलांच्या गल्ल्यातील तीन हजार रुपये व एक हजार रुपये किमतीचा सोनी कंपनीचा कॅमेरा असा एकूण ४ लाख ४ हजारांचा ऐवज अज्ञात चोरट्याने घरफोडी करून चोरून नेला. या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बैसाणे करीत आहेत.---------------------------
हिंदुस्थान समाचार / CHANDRASHEKHAR SUKHDEV GOSAVI