गेल्या २४ तास इंडिगोचे सुमारे ४०० प्रवासी इस्तंबूल विमानतळावर अडकले
इस्तंबूल, 13 डिसेंबर (हिं.स.)। तुर्कीहून मुंबईला जाणारे शेकडो विमान प्रवासी इस्तंबूल विमानतळावर अडकले आहेत. अनेक तास अडकून पडलेल्या प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. इंडिगोचे सुमारे ४०० प्रवासी इस्तंबूल विमानतळावर २४ तास अडकले आहेत.अडकलेले प्रवासी
इस्तंबूल


इस्तंबूल, 13 डिसेंबर (हिं.स.)। तुर्कीहून मुंबईला जाणारे शेकडो विमान प्रवासी इस्तंबूल विमानतळावर अडकले आहेत. अनेक तास अडकून पडलेल्या प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. इंडिगोचे सुमारे ४०० प्रवासी इस्तंबूल विमानतळावर २४ तास अडकले आहेत.अडकलेले प्रवासी नवी दिल्ली, मुंबई आणि तुर्की येथील आहेत. त्यांना खायला अन्न आणि राहण्यासाठी विशेष सुविधा मिळत नाहीत. गेल्या २४ तासांपासून हे सर्व प्रवासी विमानतळावरच अडकून पडले आहेत.विमान कंपनीने ऑपरेशनल कारणांमुळे उड्डाणाला उशीर झाल्याचे सांगितले.

इंडिगोचे सुमारे 400 प्रवासी इस्तंबूल विमानतळावर 24 तास अडकून पडले आहेत.उड्डाणाला होणाऱ्या विलंबाबाबत प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी आहे. इंडिगोच्या काही प्रवाशांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X आणि LinkedIn वर दावा केला की, फ्लाइटला प्रथम विलंब झाला आणि नंतर कोणतीही सूचना न देता रद्द करण्यात आली.

प्रवाशांपैकी अनुश्री भन्साळीने सांगितले की, फ्लाइटला एक तासाने दोनदा उशीर झाला, नंतर रद्द करण्यात आला आणि शेवटी १२ तासांनंतर त्याचे वेळापत्रक बदलले.काही प्रवाशांनी सांगितले की, फ्लाइटला उशीर होत असूनही, इंडिगोने निवास, फूड व्हाउचर दिलेले नाहीत आणि विमानतळावरील इंडिगो प्रतिनिधीनेही त्यांच्याशी संपर्क साधला नाही.रोहन राजा या या आणखी एका प्रवाशाने सांगितले की, दिल्लीहून सकाळी ६.४० वाजता निघालेले फ्लाइट रद्द केल्यानंतर, लोकांना थंडीचा सामना करावा लागला कारण एअरलाइनने त्यांना दिलेल्या निवासस्थानापर्यंत पोहोचण्यासाठी कोणतेही वाहन दिले नाही.

मुंबईला जाण्यासाठी थांबलेले पार्श्व मेहता यांनी लिहिले की, रात्रीचे 8 वाजलेले फ्लाइट रात्री 11 वाजेपर्यंत आणि नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजेपर्यंत पुढे ढकलण्यात आले. शिवाय, इंडिगोकडून कोणतीही घोषणा न झाल्यामुळे आणि तुर्की एअरलाइन्सच्या क्रूकडून कोणतीही माहिती न मिळाल्याने गोंधळ उडाला. या प्रवाशांच्या तक्रारींना उत्तर देताना, एअरलाइनने सांगितले की, ऑपरेशनल कारणांमुळे फ्लाइटला उशीर झाला आणि आम्ही त्याबद्दल दिलगीर आहोत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Avinash


 rajesh pande