काँग्रेसच्या काळात राज्यघटनेचागळा दाबला- अनुराग ठाकूर 
नवी दिल्ली, 14 डिसेंबर (हिं.स.) : राहुल गांधी राज्यघटना खिशात ठेवतात पण त्याचे पालन करीत नाहीत. काँग्रेसच्या कार्यकाळात शिखांची कत्तल झाली होती. काँग्रेसने आपल्या काळात राज्यघटनेचा गळा दाबण्याचे काम केल्याचे भाजप खासदार अनुराग ठाकूर यांनी म्हंटले. ल
अनुराग ठाकूर


नवी दिल्ली, 14 डिसेंबर (हिं.स.) : राहुल गांधी राज्यघटना खिशात ठेवतात पण त्याचे पालन करीत नाहीत. काँग्रेसच्या कार्यकाळात शिखांची कत्तल झाली होती. काँग्रेसने आपल्या काळात राज्यघटनेचा गळा दाबण्याचे काम केल्याचे भाजप खासदार अनुराग ठाकूर यांनी म्हंटले. लोकसभेत राज्यघटनेवर सुरू असलेल्या चर्चेदरम्यान राहुल गांधींनी केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर देताना ठाकूर बोलत होते.

राज्यघटनेवरील चर्चेत सहभागी होताना विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले. सरकारवर आरोप करताना राहुल म्हणाले की, ज्याप्रमाणे द्रोणाचार्यांनी एकलव्याचा अंगठा कापला, त्याचप्रमाणे भाजप भारतातील तरुणांचा अंगठा कापत असल्याचे राहुल गांधी म्हणाले. राहुल गांधींच्या या विधानाला प्रत्युत्तर अनुराग ठाकूर यांनी प्रत्युत्तर दिले. अनुराग ठाकूर म्हणाले की, ते अंगठे कापण्याचे बोलतात, पण त्यांच्या काळात शिखांचे गळे कापले गेले. ते राज्यघटना खिशात ठेवतात पण ते कधीच पाळत नाहीत. काँग्रेसच्या राजवटीत संविधानाचा गळा घोटला गेला. भारतीय संविधानात किती पाने आहेत हे राहुल गांधीही सांगू शकत नाहीत. ते जे पुस्तक (संविधान) दाखवतात, त्या पुस्तकात किती पाने आहेत हेही त्यांना माहीत नाही. राहुल जी, कृपया हे पुस्तक उघडा आणि वाचा. संविधानात असे लिहिले आहे की जेव्हापासून राज्यघटना तयार झाली तेव्हापासून विधिमंडळ आणि न्यायव्यवस्था यांच्यात तणाव निर्माण झाला आहे. संविधानानेच देश वाचवला. राहुल गांधींनी एकदा संविधान वाचले की, त्यांच्या कुटुंबीयांनी त्याचा कसा अपमान केला आहे ते त्यांना दिसेल. त्यांनी संविधानाचे तुकडे केले. देशाची माफी मागा. काँग्रेसने वारंवार घटनादुरुस्ती केल्याचे ठाकूर यांनी यावेळी सांगितले.-----------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande