कराटे खेळ विद्यार्थ्याना शारीरिक व मानसिक दृष्ट्या सक्षम बनवते - हारून शेख
अहिल्यानगर, 20 डिसेंबर (हिं.स.):- कराटे खेळामुळे विद्यार्थ्याची मानसिकता अत्यत सुदृढ बनते.कराटे मुळे बुद्धी तेज व तल्लख बनते.कराटे शिकणे हि एक कला आहे.सध्याच्या काळात मुला-मुलींना कराटेचे प्रशिक्षण घेणे अत्यत गरजेचे आहे,अहिल्यानगर जिल्ह्यातील वर्ल्ड
कराटे खेळ विद्यार्थ्याना शारीरिक व मानसिक दृष्ट्या सक्षम बनवते


अहिल्यानगर, 20 डिसेंबर (हिं.स.):- कराटे खेळामुळे विद्यार्थ्याची मानसिकता अत्यत सुदृढ बनते.कराटे मुळे बुद्धी तेज व तल्लख बनते.कराटे शिकणे हि एक कला आहे.सध्याच्या काळात मुला-मुलींना कराटेचे प्रशिक्षण घेणे अत्यत गरजेचे आहे,अहिल्यानगर जिल्ह्यातील वर्ल्ड फुनाकोशी शोतोकान कराटे संस्थेच्या विद्यार्थ्यांनी विविध बेल्ट परीक्षेत सहभागी होऊन घवघवीत यश मिळविले आहे,असे प्रतिपादन मुख्य प्रशिक्षक हारून शेख यांनी केले आहे.

कराटे खेळात विविध बेल्ट मिळविणार्या विद्याथ्र्यांना बेल्ट प्रदान करण्यात आले.याप्रसंगी वर्ल्ड फुनाकोशी शोतोकान कराटे संस्थेचे मुख्य प्रशिक्षक हारून शेख बोलत होते.वरील सर्व खेळाडूंना मार्गदर्शन म्हणून मुख्य प्रशिक्षक हारून शेख,रमजान शेख,तन्वीर खान,बिलाल शेख,दीपाली भालेराव यांनी काम पाहिले.विविध बेल्ट परीक्षेत यश मिळविणारे विद्यार्थी खालीलप्रमाणे आहेत.

यलो बेल्ट -आरवी मानधने,आराध्या अजबे ,दिव्यांशी मोटे ,गार्गी काळे ,बुऱ्हानुद्दीन लतिफ़जीवाला ,ध्रुव कर्पे ,श्लोक वाघ ,साक्षी जोशी ,अनन्या कर्पे ,आराध्या खंडेलवाल. ऑरेन्ज बेल्ट - आयुष कुटे, अरहम फिरोदिया ,दिव्येश कांबळे ,अनन्या रासकर ,सिद्धी ठोंबरे. ग्रीन बेल्ट - ओम शिंदे ,अनुष्का रासकर. ब्ल्यू बेल्ट - आरुष डांगे ,स्पर्श कांकरिया ,कैवल्य नरवडे ,संचित कुलट ,अर्णव बोथरा ,शौर्य चिंता ,सुजित कुलट. पर्पल बेल्ट - अनुष्का कोहक ,संस्कृती राऊत ,नैतिक कंठाळी. ब्लॅक बेल्ट - कस्तुरी नरवडे. कराटे परीक्षा पर्यवेक्षणासाठी ब्लॅक बेल्ट - ईशान होशिंग ,स्वराज नारायणे ,विधी गुंदेचा ,अहना भंडारी ,आदित्य बोरा ,पार्श्व भंडारी ,आशिष शिंदे.

हिंदुस्थान समाचार / Shirish Kulkarni


 rajesh pande